नांदेड| नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेश पावडे यांच्या जनसंपर्क – कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खा. वसंतराव चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्जा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस (संघटन व प्रशासन ) नाना गावंडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
आगामी निवडणुकीच्या नांदेड उत्तर विधानसभा अनुषंगाने विधानसभा मतदारसंघातील जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेश पावडे गेले अनेक महिन्यापासून अथक परिश्रम घेत आहेत. सर्वसामान्यांचा कळवळा असलेल्या सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता म्हणून ओळख मिळविलेल्या राजेश पावडे यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमही राबविले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत काँग्रेसने त्यांच्या खांद्यावर जिल्हा कार्याध्यक्ष पदाची धुरा सोपवली.
काँग्रेसची ध्येय धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि नांदेड उत्तर मध्ये काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी राजेश पावडे यांच्या फुले मार्केट येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले याच वेळी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शेकडो महिलांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे हस्ते छत्र्यांचे वाटप करण्यात आले. त्यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या छत्री वाटपाचा शेकडो महिलांनी लाभ घेतला.
यावेळी राजेश पावडे यांच्या माध्यमातून एक आगळी वेगळी अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे खड्डे मोजा व बक्षीस जिंका तसेच याप्रसंगी आ. मोहन हंबर्डे, जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, नांदेड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अब्दुल सत्तार, धनराज राठोड व नांदेड शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.