किनवट /परमेश्वर पेशवे| गेल्या 30 ते 35 वर्षापासून भाजप पक्ष वाढीसाठी पक्षामध्ये एक निष्ठेने काम करत असताना आंध आदिवासी जमातीचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांना विधान परिषदेवर किंवा राज्यसभा अशा संविधानिक पदावर त्यांचा विचार जर नाही केला तर येणाऱ्या विधानसभेला विदर्भामधून पाच ते सात जागेवर भाजपला हार म्हणावी लागेल अशी धक्कादायक माहिती पत्रकार परिषदेतून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र सचिव दादारावजी टारपे यांनी दिली आहे.


महाराष्ट्रात गटातटाच्या राजकारणाने अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला आणि त्यातच भाजपला लोकसभेला पराभवाला सामोरं जावं लागलं.. महाराष्ट्र एवढ्यावरच थांबला नाही तर भाजप मधल्या काही निष्ठावंत माजी मंत्र्यांनी राजीनामे देण्याला सुरुवात केल्याने भाजपला धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झाली हे ताजं चित्र नांदेडमध्ये पाहायला मिळाल आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्याचे राजीनामे देण्याचे सत्र आज ही सुरू असतानाच पुन्हा एकदा आता विदर्भामध्ये सुद्धा भाजपला धक्का बसतो की काय अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे हीच जर परिस्थिती राहिली तर विदर्भात भाजपला मात्र जवळपास पाच ते सहा विधानसभेवर हार मानावी लागेल हे मात्र तितकच खरं आहे.


भाजपकडून उमरखेड विधानसभा क्षेत्रातून दोन वेळेस आमदार राहिलेले आणि पुन्हा उमरखेड मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने माजी आमदार उत्तमराव इंगळे यांनी भाजपमध्ये एक निष्ठेने काम करून दोनदा राखीव मतदार संघामधून विधानसभेला भाजपचेच उमेदवार निवडून आणले. असे जवळपास 30 ते 35 वर्षे भाजपमध्ये राहून एक निष्ठेने काम करणारे भाजपचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांची भाजपने राज्यसभा किंवा विधान परिषदेवर निवड करायला पाहिजेत होती मात्र तसे झाले नाही आणि भाजपमध्ये नव्याने पक्ष प्रवेश करणाऱ्यांना विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर निवड केली जाते त्यामुळे विदर्भातील 45 ते 50 लाख असलेले आंध आदिवासी जमात ही भाजपावर नाराजी व्यक्त करत आहेत.


त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला आंध आदिवासी जमात ही भाजपाला विरोध करण्याचे चित्र दिसून येत असल्याने विदर्भातील जवळपास पाच ते सात विधानसभेच्या जागेवर भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात असताना 17 ते 18 विधानसभेवर आंध आदिवासी समाजाचे प्राबल्य आहे त्यामुळे 12 या विधानसभा आदिवासी जमातीमुळे नेहमीच निवडून आल्या आहेत आणि सहा विधानसभा निर्णायक ठरू शकतात त्यामुळे विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर आंध आदिवासी जमातीचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांना घेतल्यावर यांचा भाजपलाच फायदा होणार आहे अन्यथा आंद आदिवासी जमात भाजपाच्या विरोधात उतरणार असल्याची माहिती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र सचिव दादारावजी टारपे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.

या पत्रकार परिषदे दरम्यान भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वपाल धुळधुळे. भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष धनराज सोनटक्के, भाजपा किसान सेलचे तालुका उपाध्यक्ष आनंद साखरे. गंगाधर सरकुंडे, रामेश्वर खंदारे, सुनील भालेराव. पत्रकार परमेश्वर पेशवे, गौतम कांबळे, सचिन उबाळे शिवानंद राठोड. इब्राहिम घोडके यांच्यासह विविध वृत्त पत्राचे पत्रकार उपस्थित होते.
गेल्या 30 ते 35 वर्षापासून एक निष्ठेने भाज प पक्षामध्ये काम करणारे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर घ्यावे अशी आंध आदिवासी जमातीची मागणी आहे जर भाजपने यावर कुठलाही विचार जर नाही केला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जवळपास 45 ते 50 लाख असलेला आदिवासी बांधव भाजपपासून दूर जाण्याचे संकेत दिसत आहेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये भाजपला फटका बसणार की काय?*


