Uttamrao Ingle ; माजी आ. उत्तमराव इंगळे यांना राज्यसभा अथवा विधान परिषदेवर घ्यावे – NNL
किनवट /परमेश्वर पेशवे| गेल्या 30 ते 35 वर्षापासून भाजप पक्ष वाढीसाठी पक्षामध्ये एक निष्ठेने काम करत असताना आंध आदिवासी जमातीचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांना विधान परिषदेवर किंवा राज्यसभा अशा संविधानिक पदावर त्यांचा विचार जर नाही केला तर येणाऱ्या विधानसभेला विदर्भामधून पाच ते सात जागेवर भाजपला हार म्हणावी लागेल अशी धक्कादायक माहिती पत्रकार परिषदेतून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र सचिव दादारावजी टारपे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात गटातटाच्या राजकारणाने अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला आणि त्यातच भाजपला लोकसभेला पराभवाला सामोरं जावं लागलं.. महाराष्ट्र एवढ्यावरच थांबला नाही तर भाजप मधल्या काही निष्ठावंत माजी मंत्र्यांनी राजीनामे देण्याला सुरुवात केल्याने भाजपला धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झाली हे ताजं चित्र नांदेडमध्ये पाहायला मिळाल आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्या...
