श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| मेट्रो ब्रेन अबॅकस अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड, लातूर यांच्या वतीने ९ वी राज्यस्तरीय अबॅकस परीक्षा दिनांक २७ जुलै रोजी श्रीक्षेत्र माहूर येथील बालाजी मंगलम येथे मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडली. परीक्षेनंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्रे व पदक देऊन गौरविण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेट्रो ब्रेन अबॅकस अकॅडमीचे संचालक संतोषजी लोहारे हे होते. समारंभाचे उद्घाटन माहूर पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, श्री रेणुकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पाटील, प्रा. डॉ. तुळशीदास गुरनुले, वरिष्ठ पत्रकार नंदकुमार जोशी व जयकुमार अडकिणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.


योगायोग मेट्रो ब्रेन अबॅकस माहूर चे गुणवंत विद्यार्थी
झेड गट : सर्वेश पाटील, अर्णव राऊत, मंजिरी फड, वेदश्री अरगुलवार, ए गट : आयुष राठोड, सावी खोंडे, सार्थक चेवटे, बी गट : स्वरा देवणे, सृष्टी सूर्यवंशी, सी गट : समृद्धी जायभाये, शताक्षी पोपुलवार, तन्वी गहूकर, डी गट : श्रेया पराते, वैदेही देवरसे, ई गट : वैभवी दिनेश अरगुलवार, एडव्हान्स गट : भक्ती भुमलू श्रीरामवार
ग्रँड टॉपर पुरस्कार – ई गटातून वैभवी दिनेश अरगुलवार आणि एडव्हान्स गटातून भक्ती भुमलू श्रीरामवार यांनी वेळेचे नियोजन आणि अचूकतेच्या जोरावर आपली गुणवत्ता सिद्ध करत ग्रँड टॉपर पुरस्कार पटकावला.


श्रीक्षेत्र माहूर येथे सात वर्षांपूर्वी फक्त दोन विद्यार्थ्यांच्या सहभागाने सुरू झालेली ही बौद्धिक चळवळ स्मिता कुळकर्णी-जोशी यांच्या प्रयत्नातून आज ६० विद्यार्थ्यांच्या सहभागापर्यंत पोहोचली आहे. या वर्षीच्या परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह आणि त्यांच्या गणन कौशल्याचे कौतुक सर्वत्र झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मेट्रो ब्रेन अबॅकस अकॅडमीच्या फ्रैंचायजीधारकांनी व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचे गणन कौशल्य आणि आत्मविश्वास निश्चितच प्रेरणादायी ठरले.



