नांदेडकरियर

Nanded Zilla Parishad : नांदेड जिल्हा परिषदेचे ६७ विद्यार्थी ‘इस्रो’ शैक्षणिक सहलीसाठी रवाना

नांदेड| ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी आकर्षण निर्माण व्हावे, त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी आणि जिल्हा परिषद शाळांचा पट वाढावा या उद्देशाने नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने ६७ विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे शैक्षणिक सहलीसाठी आज उत्साहात रवाना करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त पापळकर यांच्या संकल्पनेतून, जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या प्रोत्साहनातून तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या प्रेरणेतून या ‘इस्रो’ शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक दीपक चवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी प्राथमिक वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर, शिक्षणाधिकारी योजना दिलीप बनसोडे, तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हिंगोली येथील ज्येष्ठ अधिव्याख्याता जयश्री आठवले, डॉ. दादाराव सिरसाट, गणेश शिंदे यांच्या नियोजनातून ही सहल आयोजित करण्यात आली आहे.

दिनांक २२ मार्च रोजी नांदेड रेल्वे स्थानकावरून बेंगलोर एक्सप्रेसने विद्यार्थ्यांना हिरवी झेंडी दाखवून मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते ‘इस्रो’ सहलीचा शुभारंभ करण्यात आला. या सहलीत विद्यार्थ्यांसोबत शिक्षण विस्तार अधिकारी प्रविणा मांदळे, मुख्‍याध्‍यापक सुनिल मुत्तेपवार, प्रलोभ कुलकर्णी, बालाजी पाम्पटवार, सारिका आचमे, संतोष देशमुख, मनिषा पांचाळ, प्रवीण सूर्यवंशी, शेख शोहेब, आकाश गाडगेराव, मोतीराम माने आदी शिक्षक कर्मचारी विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी व त्यांना वैज्ञानिक स्थळांचे मार्गदर्शन करण्यासाठी सहभागी झाले आहेत.

meghana kavali Nanded Zilla Parishad : नांदेड जिल्हा परिषदेचे ६७ विद्यार्थी ‘इस्रो’ शैक्षणिक सहलीसाठी रवाना

विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन, अभियांत्रिकी व विज्ञान तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळावी, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि भविष्यात असेच विद्यार्थी देशाचे शास्त्रज्ञ बनावेत, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. तसेच या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना केरळ राज्याची संस्कृती, स्वच्छता, भाषा व वाहतुकीचे नियम यांचा परिचय होणार असून शैक्षणिक दृष्टीनेही हा दौरा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्‍याचे मत मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी व्‍यक्‍त केले. – सीईओ मेघना कावली

 

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button