नांदेडलाइफस्टाइल

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर येथील श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला.

IMG 20260309 WA0009 scaled Women's Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
IMG 20260310 WA0014 Women's Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

कार्यक्रमात प्राध्यापिका लताबाई पाध्ये, शिक्षिका माधुरी रेड्डी, वकील स्नेहाताई पार्डीकर, डॉक्टर स्वाती बोंपीलवार, ओम शांती संस्थेच्या सिंधू दीदी, शीतल दीदी, होमगार्ड सोनाली मानपुरे, नागनाथ मंदिराच्या संत देवबाई, अंगणवाडी सेविका सुशीला निम्मेवार, स्वच्छता कर्मचारी वनिता बनसोड, ज्येष्ठ नागरिक सिंधूताई मद्रेवार, श्रीमती सुवर्णा जन्नावार, रुक्मिणा चायल, नगरसेविका सुचिताताई राठोड, स्वामी समर्थ केंद्राच्या उषाताई देशपांडे, हरिपाठ सेविका संगीता साखरकर तसेच समाजसेविका सुनंदा दासेवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

IMG 20260310 WA0013 Women's Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांचे समाजातील योगदान अधोरेखित करत महिला सशक्तीकरणाचे महत्त्व स्पष्ट केले. तत्पूर्वी महिला दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!