क्राईमनांदेड

Nanded ACB Raid | हदगाव उपनिबंधक कार्यालयाचे बालाजी उत्तरवारसह तिघांना रजिस्ट्रीसाठी 1,99,000/- रुपयाच्या लाच प्रकरणी अटक -NNL

हदगाव, शेख चांदपाशा। शेत जमीनीच्या रजिस्ट्री करिता उप निबंधक कार्यालय, हदगावचे बालाजी उत्तरवार, दुय्यम निबंधक यांनी तक्रारदार यांच्याकडे रजिस्ट्री करण्यासाठी 1,99,000/- रु. नोंदणी व मुद्रांक फीसह लाचेची मागणी करून तडजोडी अंती 1 लक्ष 95 हजार रुपये ठरवून, सदरील रक्कम समीउल्ला अजमतउल्ला शेख उर्फ शमी (मुद्रांक विक्रेता/खाजगी इसम) व शेख अबूबकर करीम सिद्दिकी उर्फ बाबू (मुद्रांक विक्रेता/खाजगी इसम) यांच्याकडे देण्यास सांगितली. पडताळणीत याची खात्री पटल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुराव्यास रंगेहाथ अटक केली आहे. या लाचखोर दुय्यम निबंधकासह त्याच्या सहकार्यावर हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी दुय्यम निबंधक बालाजी उत्तरवार हे हदगाव येथे कार्यरत होते. त्यांची बदली झाल्यानंतर काही भूमाफियांनी आपल्या स्वार्थासाठी राजकिय वजन वापरून पुन्हा हदगाव येथे आणले आहे. एकूणच सर्व प्रकार पाहता उत्तरवार यांच्यामाध्यमातून आत्तापर्यंत झालेल्या रजिस्ट्री कारभाराची चौकशी केल्यास मोठया प्रमाणावर अनाधिकृत रजिस्ट्री केल्याचे उघड होईल…? असे जनतेतून बोलले जाते आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांनी मौ. हदगाव येथील गट क्रमांक 256/2 मध्ये 20 गुंठे शेतजमीन खरेदी केली होती. दि. 08/07/2024 रोजी तक्रारदार नमुद शेत जमीनीच्या रजिस्ट्री करिता उप निबंधक कार्यालय, हदगाव येथे जावून आरोपी बालाजी उत्तरवार, दुय्यम निबंधक यांना भेटले असता त्यांनी रजिस्ट्री करण्यासाठी 1,99,000/- रु. नोंदणी व मुद्रांक फी सह लाचेची मागणी केली. नमुद शेतीचे रजिस्ट्री करिता रजिस्ट्रार मागत असलेले 1,99,000/- रु. नोंदणी व मुद्रांक फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्याचे तक्रारदार यांची खात्री झाली व त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे दि. 12/07/2024 रोजी याबाबत तक्रार दिली होती.

सदर तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेडकडून लाच मागणीची पडताळणी केली असता, आरोपी क्र. 1) बालाजी उत्तरवार यांनी तक्रारदार यांना नमुद शेतीच्या रजिस्ट्री करिता नोंदणी व मुद्रांक फीसह असे म्हणून पंचासमक्ष 1,99,000/- रूपयाची मागणी केली. तेव्हा तक्रारदार यांनी सदरील रक्कम कमी करण्यास विनंती केली असता उत्तरवार यांनी 4,000/- रु. कमी द्या, असे म्हणून तडजोडी अंती 1,95,000/- रु. लाचेची मागणी करून लाच रक्कम आरोपी क्र. 2) समीउल्ला अजमतउल्ला शेख याचेकडे देण्यास सांगितले.

त्यावरून करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी क्र. 2) समीउल्ला यांनी तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम 1,95,000/- रु. उप निबंधक कार्यालय, हदगावचे आवारात स्विकारून नमुद रक्कम आरोपी क्र. 3) शेख अबुबकर याचेजवळ दिली. तक्रारदार यांना नोंदणी व मुद्रांक फिस भरल्याची 1,13,400/- रु. ची पावती दिली आहे. नमुद प्रकरणात लोकसेवक उत्तरवार यांनी नोंदणी व मुद्रांक फीचे नावाखाली तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 81,600/- रु. लाचेची मागणी करून नमुद रक्कम आरोपी क्र. 2) समीउल्ला यांचेद्वारे स्विकारली. लाच रक्कम आरोपी क्रमांक 3) यांनी स्वतःचे ताब्यात ठेवून गुन्हयास प्रोत्साहन दिले आहे. त्यावरून लाचखोर आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, पोलीस स्टेशन हदगाव, जि.नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदर कार्यवाही डॉ.राजकुमार शिंदे, भापोसे पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्र मो.क्र. 9623999944 यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी प्रशांत पवार पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड मो.क्र.9870145915 यांच्या सूचनेनुसार सापळा व तपास अधिकारी प्रिती जाधव पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड यांचे सापळा कारवाई पथक अँटी करप्शन ब्युरो, नांदेड टीम यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही लोकसेवकाने, शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ पुढील दुरध्वनी 02462-253512 टोल फ्रि क्रं. 106 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

याच लाचखोर अधिकाऱ्यांमुळे हादगावमधील अनेकजण त्रस्त झाले होते. आता हादगावमधील हिटलिस्टवर असलेल्या एकाचा नंबर लागला आणखी अनेक अधिकारी अश्या प्रकारचा तहसील, पंचायत समिती, रोजगार हमी योजना कार्यालय, हदगाव तालुक्यातील जवळपास सर्वच कार्यालयात भ्रष्टाचाराचा कळस गाठून कारभार करतात. यामुळे केंव्हाही कोणावरही धाड पडू शकते अशी चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. उत्तरवार यांच्या अटकेनंतर आता ज्यांना ज्यांना या अधिकाऱ्याने लुटले त्यांच्याकडून तीव्र संतापजनक प्रतिक्रिया व भूमिका व्यक्त केल्या जात असून, इत्तर कार्यालयातील गैरकारभारावर लगाम लावण्यासाठी हदगाव तालुक्यातील जागरूक नागरिकांनी अश्या प्रकारे कुठे अन्याय व लूट होत असेल तर काठोर भूमिका घेऊन अद्दल घडवायला पाहिजे असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!