क्राईमनांदेड

Case registered : फोटो व्हायरल करण्याची धमकि देऊन लैंगिक अत्याचार ; गुन्हा दाखल

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| फोटो वायरल करण्याची धमकी देवून शरीरसुखाची मागणी करणा-या सारखणी येथील एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आरोपीस अटक केल्यानंतर न्यायालयाने संबंधितास एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दि. २७ जुलै रोजी सिंदखेड पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर होवून पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार सारखणी येथील सरफराज खान नौशाद खान वय २७ वर्षे याने फिर्यादिचे सोबत ओळख करुन, मैत्री करुन तसेच सोबत काही फोटो काढुन यातील फिर्यादीस काढलेले फोटो दाखवुन तिच्या इच्छे विरुद्ध लैंगीक संभोग केला. यातील फिर्यादीच्या मोबाईल वर यातील आरोपीने फोटो पाठवुन शरीर सुखाची मागणी केली. व तिचा छुपा पाठलाग करुन वारंवार शारीरिक संबंधाची मागणी केली. तसेच फोटो वायरल करण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर याप्रकरणी कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

वगैरे जबाब वरुन दि. २७ जुलै रोजी सिंदखेड पोलीस ठाण्यात वरील आरोपीविरूद्ध गु.र.नं. ११५/२०२५ कलम ६४(१),७५(२) (३), ७८, ७९, ३५१(२) (३), भारतीय न्यायसंहिता २०२३ व कलम ६७ माहीती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक गणेश कराड,सिदखेड सपोनी रमेश जाधवर हे मदत करीत आहे. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून आरोपीस आज रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!