नांदेड| अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 25 व्या आणि 26 व्या अमरनाथ वैष्णोदेवी यात्रेला गेलेल्या दोन्हीही जत्थ्यातील 147 यात्रेकरूंचे नांदेड येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.अविस्मरणीय यात्रा झाल्याबद्दल सर्व यात्रेकरूंनी ढोल ताशाच्या गजरात भांगडा करत आनंद व्यक्त केला.


दिलीप ठाकूर यांनी आतापर्यंत हजारो भाविकांना घेऊन 26 वेळा अमरनाथचे तर 31 वेळा वैष्णोदेवीचे विक्रमी दर्शन घेतले आहे.यावर्षी दोन वेगवेगळे जतथे 7 दिवसाच्या अंतराने रवाना झाले होते. पहिल्या जत्थ्यात 93 यात्रेकरू होते. पहिल्या जत्थ्यातील यात्रेकरूकडून जेवणासाठी शुल्क आकारण्यात आले नव्हते. माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण,खा. डॉ. अजित गोपछडे ,नवनाथ सोनवणे, नागेश शेट्टी, हृदयनाथ सोनवणे, रेखा भताने, सतीश सुगनचंदजी शर्मा,सुभाष बंग,श्याम हुरणे, ज्ञानोबा जोगदंड जम्मू, सरदार जसबीरसिंघ जागीरसिंह अमृतसर, हास्य कवी प्रताप फौंजदार, डॉ. प्रिया त्रिमुखे बेंगलोर ,मनोज शर्मा नागपूर,अमोल गोळे अकोला, सरदार कुलदीपसिंघ लुधियाना , भुसावळचे ऍड.निर्मल दायमा व बापू महाजन व संभाजीनगरच्या कृष्णा कदम यांच्या तर्फे एका भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.


एका वेळेसच्या अल्पोहाराची सेवा देणाऱ्यामध्ये डॉ. अजयसिंह ठाकूर पूर्णा , कार्यकारी अभियंता द्वारकादास अग्रवाल, स्नेहलता जायस्वाल, प्रदीप शुक्ला भोपाळ, चंद्रकांत अप्पाराव कदम,अल्ताफ खान मनमाड,पद्माकर केंद्रे,विजया दत्ता खानजोडे,सारिका रविंद्र केंद्रे,डॉ.सुधीर शिवणीकर, अजय संगेवार, कल्पना, संजय कलकोटे, सुभाष देवकत्ते,सुरेश शर्मा ,अनिरुद्ध रामेश्वर वाघमारे,सुनील व्यवहारे यांचा समावेश होता. या अन्नदात्यांमुळे यात्रेकरूंना एकदाही जेवण विकत घेण्याची वेळ 14 दिवसाच्या कालावधीत आली नाही.यात्रेदरम्यान अमरनाथ, वैष्णोदेवी, श्रीनगर, गुलमर्ग,जम्मू, अमृतसर, आटारी बॉर्डर, दिल्ली या स्थळांना भेटी देण्यात आल्या.राष्ट्रपती भवन पाहण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. राजेशसिंह ठाकूर, सुभाष देवकत्ते, रामेश्वर वाघमारे, सुरेश शर्मा यांनी प्रत्येक यात्रेकरूंची वैयक्तिक काळजी घेतली.



पहिल्या जत्थ्यातील सर्वांचे अमरनाथ व वैष्णोदेवीचे दर्शन झाल्यानंतर दिलीप ठाकूर हे विमान प्रवासाद्वारे दुसऱ्या जत्थ्यात सामील झाले.11 जुलै रोजी नांदेड येथून दिलीप ठाकूर व संदीप मैंद यांच्या नेतृत्वाखाली रवाना झालेल्या दुसऱ्या जत्थ्यात 43 यात्रेकरू, 4 टूर मॅनेजर,7 केटरिंग टीमचे सदस्य असे 54 जण होते. या सर्वांचे 15 जुलै रोजी अमरनाथचे दर्शन झाले. टूर मॅनेजर म्हणून विशाल मुळे, लक्ष्मीकांत जोगदंड यांनी चोख कामगिरी बजावली.ठाणे येथील उदय वेखंडे यांच्या केटरिंग टीमच्या सदस्यांनी वेळेवर ताजे व रुचकर खाद्यपदार्थ दिल्यामुळे सर्वांची प्रकृती उत्तम राहिली. उत्कृष्ट वातानुकूलित निवास व्यवस्था, आरामदायी बसेस आणि दिलीप ठाकूर यांच्या भरपूर मनोरंजनामुळे सर्व यात्रेकरू समाधानी आहेत.

अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष दिलीप ठाकूर यांनी तीन महिन्यापासून चालण्याची व प्राणायामची पूर्वतयारी घेतली असल्यामुळे अवघड असलेल्या अमरनाथ यात्रेत कोणालाही त्रास झाला नाही.विशेष म्हणजे दोन्हीही जत्थ्यातील यात्रेकरूंचे दर्शन झाल्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे काही तीन दिवस यात्रा स्थगित करण्यात आली होती.भाऊ ट्रॅव्हल्स व माय हॉलिडेज च्या वतीने अतिशय नियोजनबद्ध यात्रा आयोजित केल्याबद्दल सर्व भाविकांनी समाधान व्यक्त केले.

