नांदेड l जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली, नांदेड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांना दर्जात्मक आणि गुणात्मक आरोग्य सेवा पुरवण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या विशेष नियोजनाने, जिल्ह्यातील सर्व ऊसतोड कामगारांना आरोग्य विभागामार्फत आवश्यक असणाऱ्या एकूण १३ प्रकारच्या आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत.


ऊसतोड कामगारांना सर्व समावेशक आरोग्य सेवा मिळाव्यात हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, हंगाम पूर्व, हंगामा दरम्यान आणि हंगाम पश्चात आरोग्य तपासण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. कामगारांचे व त्यांच्या कुटुंबाचे (महिला आणि बालके) आरोग्य सुरक्षित व सुदृढ ठेवण्यासाठी या सेवा अत्यंत महत्त्वाच्या आहेत.


👉 कामगारांना पुरवण्यात येत असलेल्या प्रमुख १३ आरोग्य सेवा (13 Services Provided by CHO) खालीलप्रमाणे आहेत:


• 1) Care in Pregnancy and Childbirth: गर्भधारणा आणि प्रसूतीमधील काळजी.
• 2) Neonatal and Infant Health Care Services: नवजात आणि बाल आरोग्य सेवा.
• 3) Childhood and Adolescent Health Care Services: बालपण आणि पौगंडावस्थेतील आरोग्य सेवा.
• 4) Family Planning, Contraceptive Services and other Reproductive Health Care Services: कुटुंब नियोजन आणि इतर प्रजनन आरोग्य सेवा.
• 5) Management of Communicable Diseases: संसर्गजन्य रोगांचे व्यवस्थापन.
• 6) General Out-patient Care for Acute Simple Illnesses and Minor Ailments: साध्या आणि किरकोळ आजारांसाठी सामान्य बाह्यरुग्ण सेवा.
•7) Screening, Prevention, Control, and Management of Non-Communicable Diseases (NCDs): असंसर्गजन्य रोगांची तपासणी, प्रतिबंध आणि व्यवस्थापन.
• 8) Care for Common Ophthalmic and ENT Problems: सामान्य डोळे आणि कान-नाक-घसा (ENT) समस्यांवरील काळजी.
• 9) Basic Oral Health Care: मूलभूत तोंडी आरोग्य सेवा.
• 10) Elderly and Palliative Health Care Services: वृद्ध आणि उपशामक आरोग्य सेवा.
• 11) Emergency Medical Services including Burns and Trauma: भाजणे आणि आघातांसह आपत्कालीन वैद्यकीय सेवा.
• 12) Screening and Basic Management of Mental Health Ailments: मानसिक आरोग्य तपासणी आणि मूलभूत व्यवस्थापन.
• 13) Yoga and Ayush: योग आणि आयुष आधारित सेवा.

नांदेड जिल्ह्यात सहा तालुक्यात ऊसतोड कामगार असून महिलांच्या तपासण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक स्त्री रोग तज्ञांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
हंगामपूर्व तपासणी मध्ये एकूण अपेक्षित २४४४१ ऊस तोड कामगारांपैकी महिला व पुरुष एकूण १९२८८ तपासणी झालेल्या आहेत. सद्या हंगामदरम्यान तपासणी मध्ये २८३ महिलांची तपासणी झाली आहे. राहिलेल्या महिलांची तपासणी सुरु आहे. आणि प्रत्येक कामगारांना हेल्थ कार्ड देण्यात येत आहे.
या वरील सर्व सेवांचा लाभ घेऊन आपले आरोग्य सुदृढ ठेवावे, असे कळकळीचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व ऊसतोड कामगारांना केले आहे. आरोग्य तपासण्यांसाठी सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


