करियरनांदेड

Virasaiva-Lingayat Sampraday ; विरशैव -लिंगायत सांप्रदायात दीक्षा संस्कार महत्वाचा; युवासंत दिगंबर शिवाचार्य महाराज यांचे प्रतिपादन हजारों भाविकांनी घेतली दिक्षा

उस्माननगर, माणिक भिसे l वीरशैव -लिंगायत पंथात दीक्षा हे प्रमुख संस्कार आहे हा संस्कार म्हणजे गुरु शिष्याला श्रद्धेची गाठ म्हणतात. गुरु शिष्याचे नाते निर्माण करण्याचा हा संस्कार आहे त्यात गुरुच्या अज्ञेचे पालन करणे, लिंगाची पूजा करणे जंगम किंवा वीरशैव भक्ती मुकुट परिधान करणे पवित्र रूद्रांचा जप करणे, शिवाला समवर्तीत केलेल्या पवित्र राखेचा भस्म विभूती धारण करणे, गुरूकडून प्रसाद स्वीकारणे , पवित्र पाण्याचे शुद्धीकरण करणे, वीर शेव धर्मात शिवा ची पूजा करणे वीरशैव पंथात लिंग गळ्यात परिधान करणे.

त्या शिवा ची आयुष्यभर पूजा करणे ही तत्व वीर शैव सांप्रदायांनी अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहेत असे प्रतिपादन दीक्षा शिवरात्र प्रदोष गुरु मंत्र आदी कार्यक्रमाच्या अनुषंगाने वीरशैव -लिंगायत सांप्रदायाचे तथा युवकांचे प्रेरणा स्तोत्र युवा संत वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांनी सिद्धेश्वर मंदिर येथे पार पडलेल्या या तिन्ही संस्काराच्या प्रसंगी बोलताना व्यक्त केले याप्रसंगी त्यांचा शिष्यांचा महामेळा या ठिकाणी सामिल झाला होता२७ जानेवारी हा दिवस तिन्ही संस्कारासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणून हिंदू पंतपरंपरेनुसार या दिवसाला अन्य साधारण महत्त्वाचा दिवस म्हणून गणला जातो.

या दिवशी मनुष्याच्या तपसव्याची जपाची तपाची तसेच आराधनेची गुरु च्या दिव्य सानिध्यात एक संस्कार म्हणून आयोजित केला जातो अत्यंत धार्मिक असा हा असणारा कार्यक्रम बऱ्याच वर्षानंतर उस्मान नगर वाशी यांना पाहायला मिळाला. धर्माच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण दिवस म्हणून ओळखला जातो. भक्तगणांना गुरुच्या दिव्य सानिध्यात अध्यात्माचे पाठ भक्तांच्या कानावर पडले भक्तीमय वातावरण सकाळपासूनच सिद्धेश्वर मंदिरात पाहायला मिळाले.

IMG 20250128 WA0004 Virasaiva-Lingayat Sampraday ; विरशैव -लिंगायत सांप्रदायात दीक्षा संस्कार महत्वाचा; युवासंत दिगंबर शिवाचार्य महाराज यांचे प्रतिपादन हजारों भाविकांनी घेतली दिक्षा

वेदमूर्तींच्या मंत्र उच्चारात हा कार्यक्रम संपन्न झाला गुरुवार गुरुवर्य यांच्या मुखातून अमृतवाणी भक्तगणांना ऐकावयास मिळाली या कार्यक्रमाचे आयोजन वेदमूर्ती शिवहार स्वामी मठपती यांनी केले होते सकाळपासूनच भक्तगणांनी सिद्धेश्वर मंदिरात तोबा गर्दी केली होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नव तरुणांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्यातील अनेक गावातून भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!