श्रीक्षेत्र माहूर राज ठाकूर | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवार, २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. सोमवार, १७ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. तालूक्यातील १११३ विद्यार्थी ४ केंद्रांवर ही परीक्षा देणार आहे. कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात ही परीक्षा पार पाडण्यासाठी मंडळाच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे. बारावीच्या परीक्षेला मंगळवार, ११ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली. त्या पाठोपाठ आता दहावीच्या परीक्षेला शुक्रवार, २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. तालूक्यात मराठी १११३ व उर्दू माध्यमाचे ५० विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत.


शहरातील श्री जगदंबा विघालय ३२८. तर तालुक्यातील शंकरराव विघालय आष्टा २२३ , सावित्रीबाई फुले विघालय अंजनखेड २०१ .वसतराव नाईक विघालय वानोळा ३६१, विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले असून या १११३ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था या परीक्षा केंद्रांवर करण्यात आली असून ४७ पर्यवेक्षक असल्याची माहिती परिरक्षक व्ही .के.आचणे व सहाय्यक परिरक्षक एस.एस.पाटील.यांनी दिली आहे. ४ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.विशेष म्हणजे तालुक्यात एकही उपद्रवी केंद्रांचा समावेश नाही. कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात ही परीक्षा पार पाडण्यासाठी मंडळाच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.


विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान गैरमार्गाचा अवलंब करू नये, यासाठी तहसीलदार किशोर यादव , ह्यांचे भरारी पथक राहणार आहे, बैठै पथके गठित करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत सुरू आहे का, हे बघण्यासाठी पथकांद्वारे कोणत्याही केंद्राला आकस्मिक भेट देऊन पाहणी करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांवर पोलिसांचाही बंदोबस्त राहणार आहे. विशेष म्हणजे, ज्या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नाहीत, तेथे कॉपीसारख्या गैरप्रकाराला प्रतिबंध घालण्यासाठी पूर्ण वेळ बैठा पथक तैनात राहणार आहे.




