Mahur taluka ; माहूर तालूक्यात १११३ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा
श्रीक्षेत्र माहूर राज ठाकूर | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवार, २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. सोमवार, १७ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. तालूक्यातील १११३ विद्यार्थी ४ केंद्रांवर ही परीक्षा देणार आहे. कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात ही परीक्षा पार पाडण्यासाठी मंडळाच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे. बारावीच्या परीक्षेला मंगळवार, ११ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली. त्या पाठोपाठ आता दहावीच्या परीक्षेला शुक्रवार, २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. तालूक्यात मराठी १११३ व उर्दू माध्यमाचे ५० विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत.
शहरातील श्री जगदंबा विघालय ३२८. तर तालुक्यातील शंकरराव ...
