पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याने पाकिस्ताचा ध्वज व भुट्टोच्या पुतळ्याचे केले दहन


नांदेड। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ भाजपने पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी नांदेड शहरातील मुथा चौकात झालेल्या या आंदोलनात पाकिस्तानी ध्वजाचेही दहन करण्यात आले.भाजपा नांदेड महानगर तर्फे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, संघटन मंत्री संजय कौडगे व जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो देशप्रेमी नागरिकानी तीव्र निदर्शने केली.या प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यालय सहमंत्री भरत राउत यांची प्रमुख उपस्थिती होती.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांनी अपशब्द वापरले होते. याचे पडसाद सर्वत्र उमटत असून नांदेडात शनिवारी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सकाळी दहा वाजल्यापासून हनुमान पेठ येथील मुथा चौकात भाजप कार्यकर्ते हातात निषेधाचे फलक घेऊन जमा झाले होते. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. अॅड. दिलीप ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. खा. प्रताप पाटील चिखलीकर मार्गदर्शन करतांना म्हणाले, देशाच्या सर्वोच्च व्यक्तीविरुद्ध अपशब्द बोलणाऱ्या विरुद्ध इतर पक्षाचे नेते मूग गिळून असल्याचा निषेध केला.

प्रवीण साले यांनी पाकिस्तानच्या या आगळीकीचा जवाब देण्यात येईल असा इशारा दिला. याप्रसंगी प्रणिता देवरे चिखलीकर, व्यंकट मोकले, अनिलसिंह हजारी, सुशील कुमार चव्हाण, डॉ. सचिन पाटील उमरेकर, अकबरखान पठाण यांचे समायोजित भाषणे झाली. यानंतर पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टोच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले. खा. चिखलीकर यांच्या हस्ते भुट्टोचा पुतळा व पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. तर संतप्त तरुणांनी रस्त्यावर टायर जाळल्यामुळे काही वेळ वाहतूक बंद झाली होती. मात्र पोलिसांनी हस्तक्षेत्र करीत वाहतूक सुरळीत केली.

खा. चिखलीकरांचा हात भाजला – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ शहरातील मुथा चौकात आंदोलन झाले. यावेळी पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.बिलावल भुट्टोचा पुतळा जाळत असताना या आगीचा अचानक भडका उडाल्याने खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हातावरील कपड्याने पेट घेतला, यात त्यांचा हात भाजला गेला. सुदैवाने त्यांच्याजवळ असलेल्या कार्यकर्त्यांनी तात्काळ आग विझवली त्यामुळे अनर्थ टळला. या घटनेत खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हाताचे चार बोट भाजले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात प्राथमिक उपचार करून रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
यावेळी भरत राऊत,बापू देशमुख, बाळू खोमणे,दीपकसिंह रावत, दिलीपसिंघ सोडी,शितल खांडील,दीपक कोठारी,शितल भालके,शततारका पांढरे, महादेवी मठपती, अभिलाष नाईक,केदार नांदेडकर,प्रेम कुमार फेरवानी,किशोर यादव, संतोष परळीकर,सुमित राठोड, दिगंबर लाभशेठवार,संजय घोगरे पाटील, सुनील भालेराव,बबलू यादव,अनिल पाटील बोरगावकर,चक्रधर कोकाटे, गजानन उबाळे,उमेश स्वामी,साहेबराव गायकवाड,शंकर मनाळकर, कामाजी सरोदे,बजरंग जोंधळे, कुणाल गजभारे,अंकुश पार्डीकर, राजाराम टोम्पे,सुमित सोनकांबळे,कृपालसिंघ हुजूरीया, जसबीरसिंघ धुपिया, अभिषेक सौदे,संतोष बेरुळकर,प्रेम जुनी,जनार्दन गुपिले, सागर डहाळे,सुरेश लोट,राज यादव,अक्षय आमिलकंठवार,उमेश सरोदे,संतोष गुजरे,नरेश आलमचंदानी, प्रज्ञा देशमुख, श्रद्धा चव्हाण,सुमन मामीलवाड,लक्ष्मी वाघमारे,अपर्णा मोकाटे, अनुराधा गिराम, सोनू उपाध्याय,बालाजी सूर्यवंशी,निलेश कुंटूरकर,लक्ष्मण यमलवाड,वेदांत पोफळे ,अमोल कुलथीया, सागर जोशी,विशाल शुक्ला, अनिल लालवानी तसेच अनेक देशप्रेमी नागरिक व भाजपा कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती.