Navratri Festival ; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्या दुर्गा माता मुर्तीचे मुख्य मार्गावरून झरी खदान येथे विसर्जन – NNL

नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील व‌ सिडको हडको शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्या दुर्गा माता मुर्तीचे मुख्य मार्गावरून गरबा दांडिया खेळात महिलांच्या मोठ्या सहभागाने रात्री उशिरा पर्यंत झरी खदान येथे विसर्जन करण्यात आले, यावेळी जागोजागी प्रसाद व‌ पाणी वाटप करण्यात आले तर ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सिडको हडको असदवन,वाघाळा, वसरणी, जुना कौठा, नवीन कौठा या शहरी भागात परवाना‌ व विना‌ परवना‌४७ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांनी तर ग्रामीण भागातील धनेगाव,वाजेगाव,तुप्पा, विष्णुपुरी, कांकाडी, भायेगाव, यासह ग्रामीण भागात ५० विनापरवाना व‌परवाना सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांनी नोंदणी केली होती.

सिडको ‌व हडको भागातील ‌ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांनी आकर्षक व‌सुबक मोठ्या मुर्ती पर जिल्ह्यातील व‌ हैदराबाद येथुन आणल्या होत्या, सिडको व हडको नटराज दुर्गा, नवयुवक दुर्गा, छत्रपती दुर्गा, वैष्णवी देवी, नवयुवक दुर्गा,श्री सप्तशृंगी देवी,श्री नृसिंह दुर्गा, ओमकार दुर्गा, शिवनेरी दुर्गा, अयोध्या दुर्गा, वैभव नवदुर्गा,त्रिरूपुर वासनी दुर्गा माता महोत्सव,यासह सिडको हडको भागातील विविध दुर्गा महोत्सव यांनी मुख्य सार्वजनिक मिरवणूक मध्ये सहभागी होत ढोलताशांच्या गजरात दांडीया व गरबा खेळत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या,विशेष म्हणजे ढोलताशांच्या गजरात या भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आल्या. मुख्य मिरवणूक मार्गावर ‌पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button