मुंबई| झिप इलेक्ट्रिक या भारतातील आघाडीच्या तंत्रज्ञान-सक्षम ईव्ही-अॅज-ए-सर्विस प्लॅटफॉर्मने ईव्ही सेगमेंटमधील अद्वितीय फ्रँचायझी प्लॅन झिपएक्सच्या लाँचची अभिमानाने घोषणा केली आहे. यामुळे भारतातील व भारताबाहेरील विविध भागांमधील ईव्ही अॅसेट्स, प्रक्रिया व व्यक्तींना एकत्र करत कार्यसंचालनांचे डिजिटलायझेशन करण्यास मदत होईल.
झिपने भारतातील द्वितीय व तृतीय श्रेणीच्या बाजारपेठांमधील फ्लीट ऑपरेटर्सना सक्षम करण्यासाठी फुल-स्टॅक सास प्लॅटफॉर्म डिझाइन केला आहे, ज्यामुळे झिप फ्रँचायझी मॉडेलला त्यांच्या नगरांमध्ये/शहरांमध्ये लाँच करण्याचा पर्याय मिळेल. झिपएक्ससह फ्लीट अॅग्रीगेटर्स, लॉजिस्टिक्स कंपन्या आणि आता नवीन उद्योजक झिपएक्सच्या क्षमतेचा फायदा घेत त्यांच्या कार्यसंचालनांना विनासायासपणे व्यवस्थापित करू शकतात, प्रगत एआय, आयओटी व मशिन लर्निंग तंत्रज्ञानांचा वापर करत योग्य ईव्ही खरेदी करण्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकतात. तसेच राइडर ऑनबोर्डिंग व डिबोर्डिंग, राइडर प्रोफाइलिंग, बॅटरी स्वॅपिंग, तिकिटींग, डेटा विश्लेषण, बॅटरी लाइफ सायकल मॅनेजमेंट सुविधा मिळवण्यासोबत कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी व्यवसाय कार्यसंचालने व्यवस्थापित करू शकतात, खर्च कमी करू शकतात आणि रस्त्यावर भावी अब्जो ईव्ही धावणे सक्षम करण्याच्या दृष्टीकोनासह लास्ट-माइल डिलिव्हरीमध्ये इलेक्ट्रिक वेईकल्सच्या (ईव्ही) वापराला गती देऊ शकतात.
झिपएक्स फ्रँचायझी लाँच प्लॅन ४२ लाख रूपये गुंतवणूकीच्या आकर्षक तत्त्वासह सुरू होतो आणि पहिल्या १० फ्रँचायझी सहयोगींना २०९ टक्के आरओआय व ६८ टक्के एक्सआयआरआरची खात्री देतो. फ्रँचायझीची ४२ लाख रूपयांची किमान गुंतवणूक त्यांना त्यांच्या बाजारपेठेत त्वरित ४० झिप इलेक्ट्रिक स्कूटरसह सुरूवात करण्यास सक्षम करेल. तसेच २० महिन्यांच्या आत या गुंतवणूकीची परतफेड केली जाईल आणि ३ वर्षांच्या कार्यसंचालनांमध्ये ८८ लाख रूपयांचा एकूण परतावा मिळेल.
झिप इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश गुप्ता म्हणाले, ”झिपएक्स फ्लीट मॅनेजमेंट टूलपेक्षा अधिक आहे, ते लॉजिस्टिक्स उद्योगासाठी परिवर्तनात्मक सोल्यूशन आहे. आमच्या प्रगत तंत्रज्ञानासह आमचा उद्योजकांना झिप आणि त्यांच्या ताफ्यांचे अधिक कार्यक्षमपणे विस्तार करण्यास सक्षम करण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे भारतातील व परदेशातील अधिकाधिक शहरांमधील लॉजिस्टिक्समध्ये इलेक्ट्रिफिकेशन व शाश्वततेच्या व्यापक ध्येयाप्रती योगदान दिले जात आहे.
झिपएक्स ईव्ही फ्लीट व्यवस्थापनाची अद्वितीय आव्हाने जसे उच्च अपफ्रण्ट खर्च, डेटा-संचालित निर्णय घेण्याचा अभाव आणि झिपने गेल्या ७ वर्षांमध्ये निर्माण केलेले रिअल-टाइम ट्रॅकिंग व ऑप्टिमायझेशनसाठी गरज यांचे निराकरण करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. प्रबळ तंत्रज्ञान-संचालित सोल्यूशन देत झिपएक्स कंपन्यांना या अडथळ्यांवर मात करण्यास आणि शाश्वतपणे त्यांच्या कार्यसंचालनांमध्ये वाढ करण्यास, तसेच झिप तंत्रज्ञान व एसओपींसह झिपला निर्माण करण्यास लागलेल्या ७ वर्षांऐवजी ७ आठवड्यांमध्ये कार्यरत होण्यास सक्षम करण्याचा मनसुबा आहे.”