हिमायतनगर| दिनांक 21 जून 2025 शनिवारी हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय या ठिकाणी केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय द्वारे निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्य’ (Yoga for One Earth and One Health) या विषयावर ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.


त्यानिमित्ताने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते ह्या अध्यक्ष म्हणून लाभल्या होत्या. त्या स्वतः एक नियमित योग अभ्यासक असल्यामुळे त्यांनी स्वतः सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व योग करण्यासाठी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना योगसाधनेचे महत्त्व सांगत त्यांना योग प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्यांनी योग साधनेमुळे आपण आपले शरीर स्वास्थ्य कशा पद्धतीने निरोगी ठेऊ शकतो याचे मार्गदर्शन केले.


या प्रसंगी मंचावर महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा डॉ वसंत कदम आणि हिंदी विभागचे प्रा डॉ शिवाजी भदरगे हे उपस्थित होते त्यांनी उपस्थितांना योग प्रशिक्षण दिले ज्यामध्ये त्यांनी सूर्यनमस्कार, प्राणायाम, वृक्षासन, त्रिकोणासन, ताडासन, पद्मासन, वज्रासन, भुजंगासन, धनुरासन, हलासन, शवासन आदी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागचे कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ आशिष दिवडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यां, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्यासंखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार रा से यो विभागाचे सहकार्यक्रमाधिकारी प्रा मुकेश यादव यांनी मांडले.




