Poetry’s Collection : ‘आनंदी चांदणे’ ललित काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी

नांदेड| शहरातील नवोदित कवयित्री नीलम नांदेडकर (कुलकर्णी) यांच्या ‘आनंदी चांदणे’ या ललित काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी दि. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शिवाजीनगर येथील Hotel Atithi येथे आयोजित करण्यात आला आहे.

जीवनातील विविध अनुभव, समाजातील संवेदनशीलता, निसर्ग आणि जीवनशैली अशा विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कवितांचा या काव्यसंग्रहात समावेश आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवयित्री व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वृषाली किन्हाळकर राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व रंगकर्मी डॉ. जीवन पिंपळवाडकर तसेच ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दिगंबर भास्करराव जोशी यांची उपस्थिती लाभणार आहे.

या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमींनी व निमंत्रितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नीलम प्रसाद नांदेडकर (कुलकर्णी) व प्रसाद प्रकाशराव नांदेडकर यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button