कृषीनांदेड

Yellow Alert : नांदेड जिल्ह्यासाठी आज दिनांक 5 रोजी ‘यलो अलर्ट

वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क

नांदेड (प्रतिनिधी) जिल्ह्यात आज (५ एप्रिल २०२६) एक दिवसासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दुपारी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

विशेषतः वीजांचा कडकडाट आणि गडगडाटी पावसामुळे धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे.

⚠️ काय काळजी घ्याल?
विजांचा कडकडाट सुरू असल्यास शक्यतो घरातच थांबा
मोकळ्या जागेत अडकले असल्यास सखल जागेत बसून स्वतःचे संरक्षण करा
घरातील विद्युत उपकरणे त्वरित बंद करा
विजेचे खांब, लोखंडी वस्तू आणि पाण्यापासून दूर रहा
सुरक्षित इमारतीतच आश्रय घ्या

❌ काय टाळाल?
लँडलाईन फोन, विद्युत उपकरणांचा वापर करू नका
उंच झाडाखाली किंवा लोखंडी शेडमध्ये थांबू नका
पाण्यात उभे राहू नका, वादळी वाऱ्याच्या वेळी बाहेर थांबणे टाळा

प्रशासनाकडून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामानातील अचानक बदल लक्षात घेता सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!