नांदेड| ग्रामीण भागात 80 ते 90 टक्के मतदान होणाऱ्या जिल्ह्यामध्ये नांदेड महानगराने मागे राहता कामा नये, प्रत्येक तरुणाने स्वत: मतदान करावे, मतदानासाठी आसपासच्या सर्व मतदारांना प्रवृत्त करावे, यावेळी लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत 100 टक्के मतदान करावे, यासाठी हजारो नांदेडकर आज एकत्र आले. घोषणांच्या आवेशपूर्ण वातावरणात नांदेडकरांना त्यांनी आवाहन केले. यावेळी विक्रमी मतदान करण्याची गळ घातली.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा आज हजारो लोकांनी एकत्रित येऊन नांदेडकरांना शंभर टक्के मतदानाचे आवाहन केले. नांदेड जिल्हा परिषद तसेच नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आज नांदेड शहरात मतदान जनजागृतीसाठी मानव साखळी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत ही मानव साखळी होती. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप (SVEEP) प्रमुख मीनल करनवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. सुमारे तीन हजार अधिकारी व कर्मचारी या मानव साखळीत सहभागी झाले होते. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. लोकशाही बळकट करण्यासाठी ही मानव साखळी तयार करून सर्वांना मतदानाचा संदेश देण्यात आला.
जिल्ह्यात कमी मतदान झालेल्या् 270 ठिकाणी केंद शासनाच्या वतीने चित्ररथा्द्वारे मतदान जनजागृती केली जात असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली. मानवसाखळी या कार्यक्रमात अतिरिक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, उपायुक्तु अजितपालसिंग संधू, सहाय्यक आयुक्त फरहदउल्ला बेग, प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले, सामान्य् प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, जिल्हा् आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जिल्हा कृषि अधिकारी आईतवाडे, महापालिकेचे शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांच्यासह स्वीप टीमचे प्रलोभ कुलकर्णी, सुनील मुत्तेपवार , सारिका आचमे, कविता जोशी, रुस्तुम आडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यात 21 हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग
मतदान जनजागृतीसाठी जिल्ह्यात विविध उपक्रम घेतले जात आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या प्रमुख मीनल करनवाल यांनी आवाहन केल्यानुसार तालुकास्तरावरील जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व कार्यालयाच्या वतीने मानव साखळी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मानव साखळी करुन मतदानाची जनजागृती केली.