नांदेड| विशेष सहाय्य योजनेतून तहसीलस्तरावर विधवा,दिव्यांग आणि ज्येष्ठ व्यक्तीं लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीच्या दाखल्याचा तगादा लावला जातो आता त्यातून सुटका होण्याची संधी ॲपने उपलब्ध झाली आहे तरी या ॲपचा लाभ घेऊन परेशानी टाळावी असे आवाहन संजय गांधी योजना तहसीलदार श्रीमती प्रगती चौंडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.


या सुविधेचा लाभ कसा याबाबत प्रसिध्दी पत्रकात प्रगती चौंडेकर यांनी नमूद केले आहे की बेनिफिशियरी ॲप तसेच आधार फेस आरडी ॲप या दोन ॲपचा उपयोग करून आपल्या स्मार्टफोनवरून घरबसल्या कांही मिनिटांत हयात प्रमाणपत्र तहसीलदार यांच्याकडे दाखल करू शकतात.हे ॲप वापरून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनांचा लाभ चालू ठेवता येतात.या योजनांचा लाभ दरवर्षी चालू ठेवण्यासाठी दरवर्षी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते.


या नवीन डिजिटल सुविधेमुळे ही प्रक्रिया सोयीची जलद झाली. याचा फायदा कसा घ्यायचा यासंबंधी सौ.प्रगती चौंडैकर प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हणतात, लाभार्थ्यांनी प्रथम गुगल प्ले स्टोअरवरून तथा ॲप स्टोअर वरून बेनिफिशियरी सत्यापन ॲप आणि आधार फेस आरडी ॲप मोफत डाऊनलोड करून घ्यावे.प्रथम बेनिफिशियरी सत्यापन ॲपमध्ये आपला आधार क्रमांक नोंदवावा,सदर ॲप सुचना करेल तसे आपला चेहरा स्कॅन करावा नंतर आधार फेस आरडी ॲपद्वारे सुरक्षित चेहरा ओळख प्रक्रिया पूर्ण करावी.अशा यशस्वी सत्यापनानंतर डिजीटल जीवन (हयात) प्रमाणपत्र लगेच तयार होईल आणि ते संबंधित विभागाकडे तहसीलदारकडे आपोआप पाठवले जाईल.


ही डिजिटल प्रक्रिया सुरक्षित, विश्वासार्ह आधार आधारित फेस ऑथेटिकेशनमुळे पुर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक आहे.हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी यापुढे लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयांचे फेर टळतील.आपल्याच स्मार्टफोन मोबाईलवरूनच ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. हयात प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी लाभार्थींच्या लांबचलांब रांगा टळतील, ज्येष्ठ आणि दिव्यांग लाभार्थीचा शारीरिक त्रास वाचेल,हा या राष्ट्रीय अर्थ सहाय्य योजनेचा लाभार्थ्यांना दिलासा आहे,अहेही प्रसिध्दी पत्रकात श्रीमती प्रगती चौंडेकर संगायो तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी म्हटले आहे.



