Friday, May 15

Tag: Disabled

faces on the app : विधवा,दिव्यांग, निराधार महिला पुरूषांनी आपला चेहरा एपवर दाखवा अनुदान मिळवा

faces on the app : विधवा,दिव्यांग, निराधार महिला पुरूषांनी आपला चेहरा एपवर दाखवा अनुदान मिळवा

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| विशेष सहाय्य योजनेतून तहसीलस्तरावर विधवा,दिव्यांग आणि ज्येष्ठ व्यक्तीं लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीच्या दाखल्याचा तगादा लावला जातो आता त्यातून सुटका होण्याची संधी ॲपने उपलब्ध झाली आहे तरी या ॲपचा लाभ घेऊन परेशानी टाळावी असे आवाहन संजय गांधी योजना तहसीलदार श्रीमती प्रगती चौंडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. या सुविधेचा लाभ कसा याबाबत प्रसिध्दी पत्रकात प्रगती चौंडेकर यांनी नमूद केले आहे की बेनिफिशियरी ॲप तसेच आधार फेस आरडी ॲप या दोन ॲपचा उपयोग करून आपल्या स्मार्टफोनवरून घरबसल्या कांही मिनिटांत हयात प्रमाणपत्र तहसीलदार यांच्याकडे दाखल करू शकतात.हे ॲप वापरून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनांचा लाभ चालू ठेवता येतात.या योजनांचा लाभ दरवर्षी चालू ठेवण्यासाठी ...
Latatai Umreka : दिव्यांग, पॅरा बॅडमिंटनपटू लताताई उमरेकर यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

Latatai Umreka : दिव्यांग, पॅरा बॅडमिंटनपटू लताताई उमरेकर यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| दिव्यांग, पॅरा बॅडमिंटनपटू लताताई उमरेकर यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. शुक्रवार 18 एप्रिल रोजी सकाळी 11 वा. शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे त्यांना हा सन्मान बहाल केला जाणार आहे. लताताई उमरेकर यांनी जापान, थायलंड, दुबई, युगांडा याठिकाणाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचे पॅरा जागतिक स्पर्धामध्ये प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच भुवनेश्वर, दिल्ली, झारखंड या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये भाग घेतला आहे. त्यांना क्रीडा विभागात महाराष्ट्र शासनाने थेट नियुक्ती दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील या क्रीडा पटूचे या पुरस्कारासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंमरे यांच्यासह सर्व मान्यवरांनी स्वागत केले आहे. त्यांचे प्रशिक्षक किरण माने व चेतन माने यांनी देखील या उपलब्धीसाठी त्यांचे कौतुक केले आहे....
error: Content is protected !!