नांदेड| केवळ विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी शेतकरी , शेतमजूर आणि मतदारांच्या डोळ्यात धुळफेक करत आश्वासनाच्या खैराती वाटल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे गाजर दाखवून त्यांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे महायुती सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनाचा जाब विचारण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या वतीने नांदेड जिल्ह्यात जिल्हाप्रमुख बबन बारसे यांच्या नेतृत्वात आज भोकर, मुदखेड ,अर्धापूर आणि मुखेड तहसील कार्यालयांवर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला . या ट्रॅक्टर मोर्चात शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बबन बारसे यांच्या नेतृत्वात आज काढण्यात आलेल्या ‘ क्या हुआ तेरा वादा ‘ ट्रॅक्टर मोर्चात अर्धापूर तालुका प्रमुख संतोष कल्याणकर , शहरप्रमुख काजी सलाउद्दीन, पंचायत समितीचे उपसभापती अशोक कपाटे , अशोक डांगे , सुनील बोबडे , ओम नागलगमे , संतोष पाटील कदम , गजानन गव्हाणे , नांदेड उत्तर प्रभारी तालुका प्रमुख सुनील कदम , शहर प्रमुख आनंद जाधव , मुदखेड चे तालुकाप्रमुख पिंटू पाटील वासरीकर , उपजिल्हाप्रमुख मानिक लोमटे, विधानसभा प्रमुख विश्वंभर पवार, शहर प्रमुख अविनाश झमकडे, शहर प्रमुख सचिन चंद्रे , शहर प्रमुख साहेबराव चव्हाण , अंकुश मामीडवार , बाबू चंद्रे , तालुका संघटक माधव पावडे, भोकर तालुका शिवसेनाप्रमुख संतोष आलेवाड , विधानसभा संघटक सतीश देशमुख , शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार , सुभाष नाईक , रमेश कोलमवार, रमेश महागावकर , नरसिंग वर्षेवार , रामा भालेराव , सुनील चव्हाण , मारुती पवार आणि मुखेड येथे काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चात तालुका प्रभारी उमेश पाटील , उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक , शहर प्रमुख शंकर चिंतमवार , मन्मथ आप्पा खांकरे , विजय मंगलगे , बालाजी काटशेव , शंकर पीटलेवाड , योगेश मामीडवार , शरद सावकार कोटगिरे , अनिल पाटील राजूरकर यांच्यासह शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी , शिवसैनिकांनी आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.


सत्ताधारी तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांना लगोलग कर्जमाफी देण्याचा गाजावाजा केला, तसेच वेळेत कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा पत्ता नाही. सरकारने सरड्याला लाजवेल इतका वेगाने रंग बदलला. कर्जमाफीच्या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक वर्ष संपत आले असताना कर्ज सात महिन्यांत राज्यात १००० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकऱ्यांच्या मार्फत राज्याच्या तिजोरीत जाणारा जीएसटी अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना परत करण्याच्या बाता मारल्या, मात्र जीएसटी अद्याप शेतकऱ्यांच्या वाट्याला आलाच नाही. सोयाबीन आणि कापसाचे भाव पाडण्यासाठी परदेशातून हे पीक आयात करण्याचे फतवे काढले जात आहेत. शेतकरी सन्मान योजनेची रक्कम १२ हजारांवरून १५ हजार रुपये करण्याचे आश्वासन केवळ ‘बाजार गप्पा’ ठरले आहे.



शेतमाल खराब न होण्यासाठी शीतगृह देण्याचे बोलले. पण आज पावसाने खराब झालेले नुकसानही सरकारला उघड्या डोळ्याने दिसेनासे झाले आहे. हमीभावाची ‘दीडपट’ भूलथाप ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे. खर्चाच्या दीडपट हमीभावाची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे अभी सरकार फक्त कागदावर आकडेवारीचा खेळ करते आणि प्रत्यक्षात अन्नदात्याला वाऱ्यावर सोडून त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. असा आरोप करत जिल्हा प्रमुख बबन बारसे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलेली आश्वासने त्वरित पूर्ण करा अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येतील असा इशारही जिल्हाप्रमुख बारसे यांनी दिला आहे . मागण्याचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले आहे.

अंबादास दानवे , बबन थोरात यांच्या नेतृत्वात रास्ता रोको
शेतकऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राला खोटी आश्वासन देऊन सत्ता लाटणाऱ्या महायुती सरकारला जाब विचारण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने क्या हुआ तेरा वादा या आंदोलनात उद्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे , शिवसेना संपर्कप्रमुख थोरात यांच्या नेतृत्वात महादेव पिंपळगाव फाटा आसना येथे सकाळी 11 वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे . या रास्ता रोको आंदोलनात शिवसैनिक आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाप्रमुख बबन बारसे यांनी केले आहे.


