नवीन नांदेड l सिडको येथील शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या संपर्क कार्यालय येथे गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को ॲप सोसायटी नांदेड सौ.राजश्री हेमंत पाटील यांनी भेट दिली असता फटाक्यांची आतिषबाजी मध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.


सिडको परिसरात प्रथमच शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या संपर्क कार्यालय येथे 6 जूलै रोजी सदिच्छा भेट दिली असता फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले.


यावेळी विनय पाटील गिरडे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी माजी सरपंच सुदीन बागल,नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, रवि थोरात,दशरथ बागल,रावन वरताळे काळेशवर बागल,मुजाहिंद पठाण, संतोष गिरडे,यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




