श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर तालुक्यातील मौजे हरडप येथे श्री विठ्ठल रुक्मीनी मंदीराचे वास्तुपूजन त्याच बरोबर मुर्ती प्राणप्रतीष्ठा व कलशारोहन सोहळ्याचे उद्या दि.१५ व १६ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.तेव्हा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या दोन दिवसीय सोहळ्याचा आवश्य लाभ घ्यावा,असे आव्हान आयोजकांनी केले आहे.
दोन दिवसीय आयोजित सोहळ्यात उद्या पहिल्या दिवसी दि.१५ डिसे.रोजी टाळ,मृदगांच्या गजरात व श्री विठ्ठलच्या जयघोषात रविवारी गावातून कलेश,श्री विठ्ठल रुक्मीनी तसेच श्री गणरायाचे व संत ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.यासाठी वारकरी साप्रदायीक भजनी मंडळ मदनापूर,श्री गुरुदेव भंजनी मंडळ वाई बाजार,हरडप,अंजनखेड व बंजारा भजनी मंडळ हरडप तांडा याचे सहकार्य राहणार आहे.
तर सोमवार दि.१६ डिसे.रोजी श्री विठ्ठल रुक्मीनी तसेच श्री गणरायाचे व संत ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे जल अभिषेक, महापूजा करुण ग्राम वासीयांच्या मार्गदर्शनाखाली व भाविक भक्तांच्या उपस्थितीत मूर्तीची स्थापना होणार आहे. त्यानंतर महाआरती होवून लगेच महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.तेव्हा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या दोन दिवसीय सोहळ्याचा आवश्य लाभ घ्यावा,असे आव्हान आयोजकांनी केले आहे.