नांदेड| पंजाब राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्री गगनदीप कौर उर्फ अनमोल गगन मान या 25 जून 2024 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. मंगळवार 25 जून 2024 रोजी हैद्राबाद येथून विमानाने सकाळी 8.45 वाजता नांदेड विमानतळावर आगमन. दुपारी 4.30 वाजता नांदेड येथून हैद्राबादकडे विमानाने प्रयाण करतील.
महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा
राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शुक्रवार 21 जून 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज, मुंबई विमानतळ येथून श्री गुरू गोविंद सिंहजी विमानतळ नांदेड येथे रात्री 11 वाजता आगमन. रात्री 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन, राखीव व मुक्काम.