किनवट, परमेश्वर पेशवे। अतिदुर्गम आदिवासी बहुल व अविकसित समजल्या जाणाऱ्या व जेमतेम 721 मतदान असणाऱ्या इरेगाव सारख्या खेडेगावाने आता विकासाची कात टाकली . गेल्या वीस ते पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये दुर्गम भागात असणाऱ्या इरेगाव सारख्या गावांना विकासापासून कोसोदूर राहावे लागले होते.
त्यातच ग्रामपंचायतला पुरेसा निधी मिळत नसल्याने या गावाच्या विकासास चालना मिळत नव्हती. त्यामुळे उन्हाळा असो की पावसाळा की हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये येथील लोकांना घाणीचा व दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. व चिखलातून रस्त्याची वाट काढावी लागत होती. त्यातच येतील महिला सरपंच सौ रत्नमाला अमोल गोरे उपसरपंच श्रीराम गंटलवाड गावचे ग्रामसेवक जी एन धसकनवाड यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 30 लाख रुपये चा रस्ते बांधकामासाठी निधी प्राप्त झाला.
त्याचबरोबर पाणीपुरवठा घनकचरा व्यवस्थापन सार्वजनिक शौचालय ही विविध विकासकामे या खेडेगावात आली. त्यातच गावातील तरुण आणि प्रतिष्ठित व्यक्तींची त्यांना साथ मिळाली त्यातून विकासात चालना मिळाल्याची या खेडेगावला संधी प्राप्त झाली. त्यामुळे या खेडे गावाचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत झाली म्हणजे काय वावगे ठरणार नाही. त्यातच गावात होत असलेले विकासाची कामे पाहून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. व दिनांक 29 रोजी विकासात्मक कामे पाहून ग्रामस्थांनी ग्रामसेवकाचा सरपंचाचा उपसरपंचाचा सत्कारही केला. ही एक उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल.