HomeनांदेडNew Superintendent of Police Abinash Kumar : गुन्हेगार हद्दपारीसाठी 'ऑपरेशन वॉशआऊट' –...

New Superintendent of Police Abinash Kumar : गुन्हेगार हद्दपारीसाठी ‘ऑपरेशन वॉशआऊट’ – नूतन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार -NNL

नांदेड| जिल्ह्यात चालू असलेले अवैध धंदे कायम स्वरुपी बंद करण्याबरोबर गुन्हेगारांना शोधून त्यांना जिल्ह्यात राहणे मुश्किल करत जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी ऑपरेशन वॉशआऊट राबवणार आहे. अशी माहिती नांदेडचे नूतन पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलतांना दिले.

यावेळी पत्रकारांशी बोलतांना पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात मागील दीड वर्षापासून काम करत आहे. जिल्ह्यात पोलीसांचा सर्वसामान्य नागरिकांसमवेत सलोख्याचे संबंध रहावेत यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी माझ लक्ष बेसिक पोलिसिंग राहणार आहे. हे माझ्या पुढे एकप्रकारचे आव्हानच आहे.

जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिट जमादार नेमले आहेत. परंतु त्यांची ओळख नसल्याने नागरिक कार्यालयात धाव घेतात. बिट अंमलदार यांची सर्वसामान्य नागरिकांना ओळख व्हावी. त्यांच्या अडचणी तेथेच सुटाव्यात यासाठीही माझा प्रयत्न असून जिल्ह्यात येणाऱ्या अवैध बंदुकी रोखण्यासाठी एक विशेष टीम कार्यरत ठेवणार असल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी यावेळी स्पष्ट केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments