HomeनांदेडSpecial Voter Registration ; विधानसभेसाठी आज विशेष मतदार नोंदणी अभियान -...

Special Voter Registration ; विधानसभेसाठी आज विशेष मतदार नोंदणी अभियान – NNL

 नांदेड| विधानसभा निवडणुकीमध्ये आपण मतदार आहोत अथवा नाही याची खातरजमा करून घेण्यासाठी व नसेल तर आपले नाव यादीत घालण्यासाठी उद्या विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मतदान केंद्रावर जाऊन याबाबतची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 रविवार 11 ऑगस्ट रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविले जात आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन बीएलओकडे नाव वगळणे, कमी करणे, समाविष्ट करणे,तपासणी करणे ,ही प्रक्रिया करता येणार आहे.

जिल्ह्यामध्ये मतदार प्रारूप यादीचे दुसरे पुननिरीक्षण अभियान 6 ऑगस्ट पासून सुरू झाले आहे.उद्या दिनांक 11 ऑगस्ट रोजीही मतदान पुनरिक्षण राबविण्यात येणार आहे. याशिवाय पुढच्या आठवड्यात दिनांक 17 व 18 ऑगस्ट रोजी हे अभियान राबविण्यात येणार आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments