New Superintendent of Police Abinash Kumar : गुन्हेगार हद्दपारीसाठी ‘ऑपरेशन वॉशआऊट’ – नूतन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार -NNL
नांदेड| जिल्ह्यात चालू असलेले अवैध धंदे कायम स्वरुपी बंद करण्याबरोबर गुन्हेगारांना शोधून त्यांना जिल्ह्यात राहणे मुश्किल करत जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी ऑपरेशन वॉशआऊट राबवणार आहे. अशी माहिती नांदेडचे नूतन पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलतांना दिले.
यावेळी पत्रकारांशी बोलतांना पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात मागील दीड वर्षापासून काम करत आहे. जिल्ह्यात पोलीसांचा सर्वसामान्य नागरिकांसमवेत सलोख्याचे संबंध रहावेत यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी माझ लक्ष बेसिक पोलिसिंग राहणार आहे. हे माझ्या पुढे एकप्रकारचे आव्हानच आहे.
जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिट जमादार नेमले आहेत. परंतु त्यांची ओळख नसल्याने नागरिक कार्यालयात धाव घेतात. बिट अंमलदार यांची सर्वसामान्य नागरिकांना ओळख व्हावी. त्यांच्या अडचणी तेथेच सुटाव्यात यासाठीही माझा प्रयत्न ...
