Hadgaon politics : हदगाव नगरपरिषद निवडणूक : अध्यक्षपदासाठी 10 तर सदस्यपदासाठी 96 उमेदवार रिंगणात

हदगाव, गौतम वाठोरे| नगरपरिषद निवडणुकीच्या धुमश्चक्रीत आज (21 नोव्हेंबर) अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाच्या एका उमेदवारांनी तसेच पाच नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

अर्ज मागे घेतल्यानंतर हदगाव नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी एकूण 10 उमेदवार रिंगणात उरले आहेत. तर 20 नगरसेवक जागांसाठी तब्बल 96 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे हदगावमध्ये चुरशीची लढत रंगणार हे निश्चित झाले आहे.

नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले उमेदवार

शिवसेना (एकनाथ गट) – रोहिणी भास्कर वानखेडे

काँग्रेस – कुमुद सुनीलभाऊ सोनुले

शिवसेना (उबाठा गट) – सिंमा बालाजी घाळप्पा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) – वर्षा वसंतराव देशमुख

वंचित बहुजन आघाडी – चाऊस अफशन इराम जाकीर

रिपब्लिकन सेना – स्वरूपा अतुल चौरे

अपक्ष – गिरी अरुणा शिवशंकर

अपक्ष – कविता कैलासजी जोशी

अपक्ष – शेख तैबूनीसा बेगम गफार

अपक्ष – सय्यद कणीस मुजीबअली

नगराध्यक्षपदासाठी दहा उमेदवार रिंगणात असल्याने प्रचाराला आता आणखी उधाण येणार आहे. पक्षीय आणि अपक्ष उमेदवारांमध्ये चुरस वाढली असून हदगावमधील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button