हिमायतनगर| शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या समोर लाऊन असलेली दुचाकी चोरट्यांनी दि.28 जानेवारीच्या रात्रीला लंपास केली असुन, चोरटा गाडी नेतानाचा व्हिडिओ सिसिटीव्ही फुटेज मध्ये (Stealth imprisonment in the cctv) दिसत आहे, तरी देखील चोरीला गेलेल्या दुचाकीं गाडीचा थांगपत्ता पोलीसांना लागला नाही त्यामुळे दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ होत आहे.

हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील रहिवासी अर्जुन आडेलू कोकरे यांचं दुकान बँक समोर आहे. सायंकाळी दुकान बंद करून दि.28 जानेवारी रोजी रात्री दररोजच्या जागेवर त्यांनी गाडी ठेवली होती. रात्री 3 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बॅंक समोर उभी असलेली गाडी क्रमांक mh12 Pw 6921 हि दुचाकी सुरू करून पसार केली. सदरील गाडी सुरू करतांनाचा व्हिडिओ सिसिटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

कार्ला येथील व्यापारी अर्जून कोकरे यांनी गाडी चोरीला गेल्याची तक्रार हिमायतनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. मात्र अद्यापही सदरील गाडीचा थांगपत्ता पोलीसांना लागला नाही. त्यामुळे हिमायतनगर शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असुन, आत्तापर्यंत अनेक गाड्या चोरीला गेल्या त्याचा तपस देखील जैसे थे असल्याने पोलिसांनी दुचाकी चोरीच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन चोरटीच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी केली जात आहे.
