अवैध वाळू वाहतुकीच्या कारणावरून मुखेडात दोन गटांत तलवारीने हल्ला; 3 जण गंभीर; पोलीस दाखल -NNL

0

नांदेड/मुखेड। जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील चांडोळा येथे अवैध वाळू वाहतुकीच्या कारणावरून दोन गटात तू तू-मै मै होऊन वाळूमाफियांनी तलवारी व खंजरने जोरदार हल्ला केला. यात मुखेड येथील तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना शुक्रवारी सकाळी घडली असून, वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरल्यानंतर पोलिसांनी दखल घेऊन पोलीस उपअधीक्षक अबिनाशकुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी गोसावी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. यासंदर्भात कुठलाही नोंद झाली नसली तरी उशिरा याबाबत गुन्हा दाखल होईल असे सांगितले जाते आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील अवैध वाळूची वाहतूक करणारे वाहन तीन युवकांनी सकाळी शुक्रवारी थांबून ठेवले होते. यावरून वाळूमाफियांमध्ये वाद झाला. चारचाकी वाहनातून आलेल्या पाच ते सहा जणांनी तलवारी, रॉड व खंजरने मारहाण केली. यामध्ये दोघांचे बोटे तुटली असून, एकाच्या डोक्यात तलवार मारण्यात आल्याने तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत

दरम्यान चांडोळा येथे झालेल्या या घटनेतीळ खंजर, रॉड हातात घेतलेला युवकाचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे मुखेड शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात माहिती मिळताच पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, पोलीस उपअधीक्षक अबिनाश कुमार व उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळी घटना घडली असली तरी अद्यापही यासंदर्भात कुठलाच गुन्हा पोलीस स्थानकात दाखल झाला नाही. सदरील घटनेमुळे वाळूमाफियांत चांगलीच खळबळ निर्माण झाली असून, या घटनेमुळे मुखेड तालुक्यात अवैध रेती उत्खनन होण्याच्या प्रकाराला पुष्टी मिळाली आहे, आता यानंतर महसूल विभाग या बाबतीत काय पाऊले उचलतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here