नांदेड

हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालय शेजारील डी पी. जवळ विजेचा शाॅक लागून वानराचा मृत्यू -NNL

हिमायतनगर। हिमायतनगर येथील ग्रामीण रूग्णालयाशेजारी असलेल्या विजेच्या डीपी जवळ विजेचा शाॅक लागून एका वानराचा मृत्यू झाला असून, महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता ही नाकारता  येणार नाही. हि घटना दि. १२ बुधवारी सकाळच्या दरम्यान घडली आहे.

हिमायतनगर येथील विद्युत महावितरण कंपनी उपविभागा अंतर्गत अनेक ठिकाणी डीपी धोकादायक परिस्थितीत अपघाताला आमंत्रण देत आहेत.  अनेक ठिकाणी विजेच्या तारा वाकल्या असून विद्युत प्रवाह असल्याने एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

ग्रामीण रुग्णालयाजवळील उघडी डीपी अपघाताला आमंत्रण देत होती. दरम्यान एक वानर विजेचा प्रवाह लक्षात न आल्याने डीपी जवळ गेले, त्यास विजेचा जबरदस्त शाॅक लागल्याने वानराचा जागीच मृत्यू झाला आहे. या ठिकाणी आठवडी बाजार देखील भरत असून, नागरिकांची उपचारासाठी व बाजार करण्यासाठी गर्दी होते आहे, त्यामुळे येथे एखादी मोठी दुर्घटना घडू शकते, ही बाब संभाव्य धोका होण्या अगोदर डीपीच्या दुरूस्तीचे काम हाती घ्यावे. अशी  मागणी शहरवाशीय नागरिकांतून पुढे आली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button