Friday, May 15

Tag: Rural Hospital in Himayatnagar next to DP. Monkey dies

हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालय शेजारील डी पी. जवळ विजेचा शाॅक लागून वानराचा मृत्यू -NNL

हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालय शेजारील डी पी. जवळ विजेचा शाॅक लागून वानराचा मृत्यू -NNL

नांदेड
हिमायतनगर। हिमायतनगर येथील ग्रामीण रूग्णालयाशेजारी असलेल्या विजेच्या डीपी जवळ विजेचा शाॅक लागून एका वानराचा मृत्यू झाला असून, महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता ही नाकारता  येणार नाही. हि घटना दि. १२ बुधवारी सकाळच्या दरम्यान घडली आहे. हिमायतनगर येथील विद्युत महावितरण कंपनी उपविभागा अंतर्गत अनेक ठिकाणी डीपी धोकादायक परिस्थितीत अपघाताला आमंत्रण देत आहेत.  अनेक ठिकाणी विजेच्या तारा वाकल्या असून विद्युत प्रवाह असल्याने एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.  ग्रामीण रुग्णालयाजवळील उघडी डीपी अपघाताला आमंत्रण देत होती. दरम्यान एक वानर विजेचा प्रवाह लक्षात न आल्याने डीपी जवळ गेले, त्यास विजेचा जबरदस्त शाॅक लागल्याने वानराचा जागीच मृत्यू झाला आहे. या ठिकाणी आठवडी बाजार देखील भरत असून, नागरिकांची उपचारासाठी व बाजार करण्यासाठी गर्दी होते आहे...
error: Content is protected !!