HomeनांदेडIndira Gandhi High School, Hudco ; इंदिरा गांधी हायस्कूल हडको मध्ये आषाढी...

Indira Gandhi High School, Hudco ; इंदिरा गांधी हायस्कूल हडको मध्ये आषाढी एकादशी निमित्याने वृक्षारोपण

नवीन नांदेड l शारदा भवन‌ शिक्षण संस्था संचलित इंदिरा गांधी हायस्कूल हडको नांदेड येथे आषाढी एकादशी निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले तर विध्यार्थ्यांनी रूक्मिणी,संत जनाबाई भुमिका साकारली.

आषाढी एकादशी निमित्ताने इंदिरा गांधी हायस्कूल हडको येथे वर्ग सातवीच्या विदयार्थीनीनी संत जनाबाई,संत कन्होपात्रा,रुक्मिणी यांच्या वेषभुशेत येऊन शाळेत वृक्षारोपण केले.

संत,भक्त व देव यांच्यातील मार्ग सोपा करतात, संतवाणी ही सत्यवाणी असते. संताचे जीवन परोपकाराचे असते. विठ्ठल संतांचे म्हणणे ऐकतो.
प्रसंगी तो संताचा दास होतो.

संत महात्म्य अवनर्णीय असते. संत संगती प्रत्येकास घडो, दुर्जन दृष्टीस न पडो.या विदयार्थ्यांना शाळेतील पर्यावरण प्रेमी शिक्षक एम. टी.कदम व शाळेचे मुख्याध्यापक जी. एम. शिंदे यांनी प्रेरणा दिली.सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments