नांदेडलाइफस्टाइल

Sangvi Asana to Malhar Chowk Bypass : सांगवी आसना ते मल्हार चौक बायपास चे तिन तेरा

नांदेड| शहरासाठी भविष्यातील एक महत्वपूर्ण रस्ता असलेल्या सांगवी आसना ते तरोडा बु. बायपास या रस्त्याचे कामकाज मागील दोन-अडीच वर्षापूर्वी सुरू झाल्याने याभागातीन नव्याने रहीवाशी झालेल्यांना मोठा दिलासा मिळाला होता कारण एकाच वेळी सेंट्रल ड्रेनेज लाईन व सिमेंट रोड सोबतच नाल्या असे काम सुरू होऊन ते पूर्णत्वास जात असल्याचे चित्र दिसून येत होते परंतु गेल्या २ वर्षापेक्षाही जास्त काळापासून रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून खड्डयांमुळे अपघातांना निमंत्रण होत आहे.

उत्तर विधानसभा मतदार संघाचे आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या प्रयत्नातून आणि दूरदृष्टीतून त्यांनी या रस्त्यासाठी मोठा निधी मंजूर करून आणत या भागाचा भविष्यकाळातील शाश्‍वत विकासासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या आसना बायपास रस्त्याची निमिर्तीस मूर्त स्वरूप देत याभागातील नव्याने विकसित होणाऱ्या वसाहतींतील रहीवाशांच्या आशा पल्लवित केल्या होत्या परंतु मागील दोन-अडीच वर्षापूर्वी सुरू झालेल्या या रस्त्याचे काम काही ना काही कारणास्तव संथगतीने होत राहीले व पूर्ण होता होता हा रस्ता अपूर्णच राहून गेला असल्याने या भागातील रहीवाशांच्या आशेवर पाणी फेरले आहे.

एकंदरीत या भागातील एक मोठा वर्ग हा आ.कल्याणकरांना माननारा असून त्यांनी केलेल्या विकास कामांवर येथील जनेतेनेही त्यांना साथ देत दाद दिली आहे त्याबळावरच राहीलेला अपूर्ण रस्ता आ.कल्याणकर हे जातीने लक्ष देत पूर्णत्वास नेतील अशी आशा या भागातील रहीवाशी व्यक्त करतांना दिसून येत आहेत.

आ.कल्याणकरांनी लक्ष घालावे
सांगवी आसना ते मल्हार चौक बायपास हा आ. कल्याणकर यांच्या पुढाकारातून आकारास आलेला एक महत्वपूर्ण रस्ता आहे व रखडलेले रस्त्याचे काम ते पुन्हा एकदा स्वतः लक्ष घालून पूर्णत्वास नेतील अशी अपेक्षा आहे तसेच अपूर्ण रस्त्यामुळे होणारे अपघात टळतील तरी आ.कल्याणकरांनी या भागातील जनतेचा महत्वाचा प्रश्‍न सोडवावा अशी मागणी होत आहे. तुळशीदास कोकाटे , सांगवी बायपास, नांदेड

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button