नांदेड| सन 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या कालावधीत घोषत आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या आणि त्यासाठी बंदिवास सोसावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान, यथोचित गौरव करण्यात येणार आहे. यानुसार अशा आणीबाणीधारकांना बुधवार 25 जून 2025 रोजी संबंधीत जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्याचे निर्देश दिले आहेत.


त्यानुषंगाने 25 जून रोजी मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र वितरीत करण्याच्या सभारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड, लोहा, कंधार, मुदखेड, हदगाव तालुक्यातील हयात आणीबाणी धारक किंवा त्यांच्या वारस पत्नी यांना बैठक कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11 वा. न चुकता उपस्थित राहण्याबाबत संबंधित तहसिलदार यांच्या स्तरावरुन कळविण्यात आले आहे. संबंधित तालुक्यातील हयात आणीबाणी धारक किंवा त्यांच्या वारस पत्नी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


आणीबाणीच्या विविध घटनांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे बुधवारी उद्घाटन
देशात दिनांक 25 जून 1975 रोजी आणिबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेला येत्या 25 जून रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात बुधवार 25 जून 2025 रोजी करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले यांच्या हस्ते सकाळी 10.30 वा. या छायाचित्र माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.


या प्रदर्शनात आणीबाणीच्या अनुषंगाने जिल्ह्यात घडलेल्या विविध घटना-घडामोडींची तसेच आणीबाणीविरोधी संघर्षात सहभागी झालेल्या विविध कार्यकर्ते-नागरिकांची छायाचित्रे व माहितीचा समावेश असणार आहे. या छायाचित्र माहिती प्रदर्शनास उपस्थित राहण्याचे आवाहन नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.



