उस्माननगर l शेतकरी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिवालय मित्र मंडळाचे अध्यक्ष बालाजी ईसादकर यांच्या संकल्पनेतून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधुन उस्माननगर येथील बसस्थानक परिसरात पाणपोईच्या माध्यमातून जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा समजून पाणपोई सुरू करण्या आली आहे. यामुळे वाटसरू नागरिकांसाठी पाणपोई ठरते वरदान.


यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक व उस्माननगर येथील माजी सरपंच तु.श.वारकड गुरूजी व इतर मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जलसेवेचे उध्दघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


उस्माननगर परिसरात उष्णतेचे प्रमाण जास्त असल्याने अंगाची लाही लाही होत आहे. या परिसरात दुरवर कुठेच पाणपोई नसल्याने. शेकापाचे जिल्हाध्यक्ष तथा शिवालय मित्र मंडळाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते बालाजी इसादकर यांनी जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा समजून पाणपोई ची व्यवस्था करून नागरिकांची थंड पाणी पाजवून आशिर्वाद मिळविताना आढळून येत आहे. सध्या लग्न सराई चालू असल्याने नागरिक आपली तहान भागवून घेत आहेत.


उस्माननगर येथे मोठी बाजारपेठ ,दवाखाने , पोलिस ठाणे ,पोस्ट ऑफीस ,बॅक ,तलाठी कार्यालय , पशुवैद्यकीय दवाखाना महावितरण कार्यालय असे अनेक कार्यालय आल्यामुळे उस्माननगर येथे अनेक गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर येत आसतात .

त्यांना पाणी पिण्यासाठी हाॅटेल शिवाय मार्ग नव्हता त्यातल्या त्यात गावची भिषण पाणी टंचाई आल्यामुळे गावात पाणी विकत घेतल्याशिवाय पर्याय नाही.सामान्य नागरिक २० रू.पाण्याची बाॅटल घेवून पाणी पिने परवडणार नाही म्हणून ह्याचा विचार करून बालाजी ईसादकर यांनी जयंतीचे औचित्य साधुन शिवालय जन सेवा सुरू केली आहे ह्या जल सेवेचे पाणी पिवून नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत .
या वेळी राहुल सोनसळे ( मुख्याध्यापक ),उपसरपंच बाशीदभाई शेख ,सरपंच प्रतिनिधी माणिक शेषेराव काळम, माजी जि.प.सदस्य माधव भिसे , माजी सरपंच अमिन आदमनकर, मारोती घोरबांड ,शिराढोण येथील पोलीस पाटील, विश्वंभर मोरे पोलीस पाटील ,माजी सरपंच प्रतिनिधी दत्ता घोरबांड, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी गंगाधर भिसे , पत्रकार सुर्यकांत मालीपाटील, गुरूनाथ माने ,राजू सोनटक्के ,गोविंद भिसे ,रामदास सोनटक्के सह आदिची कार्यक्रमास उपस्थिती होती.


