Balaji Isadkar ; शेकापाचे जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर यांची पाणपोई ठरते नागरिकांसाठी वरदान
उस्माननगर l शेतकरी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिवालय मित्र मंडळाचे अध्यक्ष बालाजी ईसादकर यांच्या संकल्पनेतून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधुन उस्माननगर येथील बसस्थानक परिसरात पाणपोईच्या माध्यमातून जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा समजून पाणपोई सुरू करण्या आली आहे. यामुळे वाटसरू नागरिकांसाठी पाणपोई ठरते वरदान.
यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक व उस्माननगर येथील माजी सरपंच तु.श.वारकड गुरूजी व इतर मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जलसेवेचे उध्दघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
उस्माननगर परिसरात उष्णतेचे प्रमाण जास्त असल्याने अंगाची लाही लाही होत आहे. या परिसरात दुरवर कुठेच पाणपोई नसल्याने. शेकापाचे जिल्हाध्यक्ष तथा शिवालय मि...
