नांदेड l मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचा येत्या रविवारी दिनांक १७ ऑगस्ट रोजी नरसी येथे चार तालुक्यातील पत्रकारांचा मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यात मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकारांना जिल्हा पत्रकार संघाच्या सदस्यांना ओळखपत्राचे वितरण करण्यात येणार आहे.


नरसी येथील नांदेड रोडवरील आदित्य गार्डनमध्ये सकाळी १० वाजता संपन्न होणार्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे हे राहणार असून यावेळी नायगाव पंचायत समितीचे माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार्या या मेळाव्यास मराठी पत्रकार परिषद मुंबईचे उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, मराठी पत्रकार परिषदचे विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे, विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष विजय जोशी, मराठी पत्रकार परिषद मुंबईचे माजी सरचिटणीस चारूदत्त चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक प्रदिप नागापूरकर, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अनिल कसबे, सरचिटणीस अनुराग पोवळे, डिजीटल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष शेख मुजीब, पत्रकार संघाचे महानगराध्यक्ष रवि संगनवार, कार्याध्यक्ष गजानन कानडे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


या सोहळ्यात नायगाव, देगलूर, मुखेड व बिलोली तालुक्यातील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते पत्रकार संघाचे ओळखपत्र वितरीत करण्यात येणार आहे. तरी या मेळाव्यास या चारही तालुक्यातील पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन नायगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बरगे, देगलुर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शाम वद्देवार, मुखेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेताब शेख व ज्ञानेश्वर डोईजड, बिलोली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव इंगळे, देगलूर तालुका डिजीटल मिडीयाचे अध्यक्ष सय्यद शमी सय्यद यूसुफ यांनी केले आहे.




