नांदेड l ज्येष्ठ नागरिक उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्काॅम नांदेडचे अध्यक्ष डाॅ.हंसराज वैद्य, सचिव प्रभाकर कुंटूरकर, अध्यक्षा सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ महिला विभाग व जिल्हा सरचिटणीस तथा सचिव भा.ज. पा. महिला मोर्चा डाॅ शितल ताई भालके यांनी खा.डाॅ.अजित गोपछडे व मराठवाडा संघटण मंत्री संजय कौडगे यांच्याशी ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनासह फेस्काॅमच्या प्रलंबित मागण्या संबंधी सविस्तर चर्चा केली. या प्रसंगी दोघांचाही यथोचित सत्कार करून गौरविण्यात आले.

आवचित्य होते खासदार डाॅ.अजित गोपछडे व संजयभाऊ कौडगे यांच्या डाॅ.हंसराज वैद्य व डाॅ.शितल ताई भालके यांच्या राहात्या घरी दि. 8/6/2025 दिवशीच्या सदिच्छा भेटीचे. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांचे दोघांनाही एक सविस्तर निवेदनही देण्यात आले. ज्येष्ठांबद्दलच्या फेस्काॅमच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली.तसेच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पक्षाच्या निवडणूक जाहिरनाम्यात मानधनासह ज्येष्ठाच्या मागण्याचा समावेश करण्यात यावा असी विनंतीही करण्यात आली.

त्यावर खा.डाॅ.अजित गोपछडे म्हणाले की मी खरच व्यथित झालो आहे.माझी नाळ गरिब,गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित,वंचित आणि शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, निराधार कामगार, विधवा माता तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांच्या कथा व व्यथा जवळून पाहिल्या व अनुभवल्या आहेत! खरच डाॅ.वैद्यसाहेब तुम्ही अतिशय योग्य व महत्वाचा लढा उभा केला आहे!येत्या पावसाळी अधिवेशनात मी जिरियाटिक अर्थात ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सविस्तर निवेदन राज्यसभेत देऊन त्यावर चर्चा घडवून आणणार आहे. त्यांना न्याय मिळवून दिल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तसेच मी व संजयभाऊ कौडगे मिळून ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनासह प्रलंबित प्रश्नांचा समावेश पक्षाच्या निवडणूक जाहिरनाम्यात समावेश करण्याचाही नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिलं.



