हिमायतनगर| तालुक्यातील मौजे सिरंजनी येथील ज्येष्ठ नागरिक तथा रहिवासी पंढरीनाथ मकाजीराव राऊत वय 95 वर्ष यांचे बुधवारी व्रद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मृत्यू पश्चात पाच मुलं, दोन मुली, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.


त्यांच्या पार्थिवावर मुळगाव सिरंजनी येथे दिनांक 13 गुरुवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. ते सिरंजणी येथील माजी सरपंच मधुकरराव राऊत यांचे वडील होते.


