नांदेडराजकीय

Nanded ; नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील सरपंचांना निधी कमी पडू देणार नाही

नवीन नांदेड l नांदेड दक्षिण मतदारसंघातील सरपंचांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही शिवसेना शिंदे गटाचे नेते आ.हेमंत पाटील यांनी जिजाऊ नगर वाडी पाटी येथे नांदेड दक्षिण मधील अनेक गावातातील सरपंच उपसरपंच व पदाधिकारी सह शैकडो कार्यकर्ते जाहीर प्रवेश सोहळा प्रसंगी केले.

27 फेब्रुवारी रोजी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जिजाऊ नगर वाडी पाटी येथे नांदेड दक्षिण मधील अनेक गावांतील सरपंच उपसरपंच व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सह शैकडो युवकाचा कामाजी पाटील सरपंच डेरला व आकाश येवले सरपंच मार्कंड यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी आ.आंनदराव बोढारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे, ओबीसी जिल्हा प्रमुख अनिल पाटील धमणे,तालुका प्रमुख अशोक मोरे,शिवसेना शहरप्रमुख तुलजेश यादव, सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे,मारोती धुमाळ, जहागीरदार महाराज,सुदीन बागल, यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थिती होती.

यावेळी बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे यासह शेतकऱ्यांना चार पाणी पाळी मिळाल्या पाहिजे, रस्ता, सिंचन यासह विविध कामांसाठी सदैव प्रयत्नशील असुन वाडी पाटी येथील जिजाऊ सृष्टी येथे वाचनालय साठी दहा लक्ष रूपये निधी देणयाचे आश्वासन आ.पाटील यांनी दिले.

आ.आंनदराव पाटील बोढारकर यांनी नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मतदारांचे आभार मानुन प्रत्येक गावातील विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून जिल्ह्यात शिवसेना पक्षाला बळकटी केवळ‌ आ.हेमंत पाटील यांच्या मुळे मिळाली असल्याचे सांगितले.

जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांनी सरपंच व उपसरपंच, पदाधिकारी यांनी प्रवेश केल्याबद्दल आभार व्यक्त केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तुकाराम पवार यांनी केले.

नांदेड दक्षिण मध्ये विविध राजकीय पक्षांच्या मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होत असतांनाच सरपंच उपसरपंच व पदाधिकारी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरपंच विठ्ठल कळके कल्हाळ,विलास रिंगे जरी, गोविंद मोरे भंगी, हणमंत घोगरे पांगरी,चांदु डक , पिंपळगाव निमजी गोविंद येवले माजी सरपंच मार्कंड, गिरीश पांगरीकर उपसरपंच पांगरी, गोविंद गंदेवार,लोभाजी गवारे माजी सरपंच वाहेगाव,शेख मेहमूद सरपंच खुपसरवाडी,शंकर सोनटक्के वाहेगाव,संतोष बारसे माजी सरपंच विष्णुपुरी,माधव पवार खरबी, गजानन कोकाटे बामणी, साहेबराव कांबळे उपसरपंच धनगरवाडी यांच्या सह उपसरपंच पदाधिकारी कार्यकर्ते व चेअरमन यांनी पक्ष प्रवेश केला. हा सोहळा फटाक्यांचा आतिषबाजी व ढोलताशांच्या गजरात उत्साहात संपन्न झाला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button