हिंगोली| सोडेगाव ता. कळमनुरी येथील वारकरी लक्ष्मण मारोती दांडेगावकर वय 50 वर्ष हे दरवर्षी पंढरपूर येथे पायी वारी करत असतात. याही वर्षी ते पायी निवृत्ती महाराज साडेगावकर यांच्या दिंडीत गेले असता बारामती येथे त्याचा दिनांक 12/07/2024 रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने सकाळी पावणे चार च्या सुमारास निधन झाले होते. त्या नंतर मृतदेह वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे नेण्यात आल्याची माहिती त्याचे सहकारी सुरेश दांडेगावकर यांनी खासदार नागेश पाटील यांना दिली.


खासदार आष्टीकर यांनी तात्काळ तेथील डीन यांना तात्काळ सोपस्कार पुर्ण करून देण्याची सूचना करून बारामती / इंदापूर चे प्रांत अधिकारी वैभव नावडकर यांना संपर्क करून स्थानिक पोलीस अधीकारी यांच्या मदतीने मृतदेह दांडेगावकर यांच्या मूळगावी सोडेगाव ता. कळमनुरी पर्यंत पाठवण्याची सूचना करून तातडीने तो मृतदेह स्व खर्चाने मूळ गावी पाठवून दिला आहे.

याबद्दल दांडेगावकर यांचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी खासदार यांच्या सवेंदन शील वृतीचे कौतुक करून आभार मानले आहेत. सध्या खासदार दिल्ली येथे असून ते लवकरच दांडेगावकर कुटुंबियांची भेट घेणार असल्याचे माहिती स्वीय सहाय्यक विनोद हामणे यांनी दिली आहे
