नवीन नांदेड l माधवराव वटेमोड हायस्कूल जुना कौठा येथे शाळेच्या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून मलनिःसारण पाईप लाईन तुंबलेल्या होत्या. या रस्त्यावर जमा झालेल्या दुर्गंधी पाण्यातुन अनेक विद्यार्थी शाळेत जाणे येणे कठीण झाले होते. याबाबत अनेक वेळा मनपा प्रशासनास निवेदन देऊनही दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रलंबित समस्येची शिवसेनचे दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्याकडे शिष्टमंडळाने भेट घेऊन मांडली. सततच्या पाठपुराव्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सोडविल्या बदल माजी उपमहापौर तथा शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांचा माधवराव वटेमोड विद्यालया तर्फे सत्कार करून शुभेच्छा देत आभार मानले आहे.


माधवराव वटेमोड विद्यालयाच्या जूनाकौठा येथे मलनिस्सारण वाहिन्या अनेक गेल्या वर्षा पासून तुंबल्या मुळेघाण पाणी साचत होते. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. एवढेच नव्हे तर वटेमोड विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या चिमुकल्यांना व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना रस्त्याने चालणे कठीण झाले होते. या समस्येमुळे शिक्षक पालक व विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त झाले होते.


या प्रकरणी शाळेने माजी उपमहापौर गिरडे यांच्यी भेट घेऊन सविस्तर माहिती दिली व मनपा प्रशासनाला आरोग्य विषयक गंभीर समस्या लक्षात घेऊन संबंधितांना तात्काळ सूचना देऊन हे काम प्राधान्याने सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा करून हि समस्या तात्काळ सोडविली. त्यामुळे सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक रस्त्याच्या समस्येपासून मुक्त झाले असुन सदरील ठिकाणी तात्काळ मलनिस्सारण वाहिन्या व्दारे घाण पाणी व गिटटी टाकून रस्ता तयार करून दिल्याने कायमची समस्या सुटली आहे. मुख्याध्यापक भगवानराव वटेमोड आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने गिरडे पाटील यांच्या शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.




