नांदेड| येत्या दि.20/7/24 रोज शनिवारी “गरिब गरजवंत माय-बाप ज्येष्ठ नागरिक लक्षवेधी मागण्या पदयात्रा तथा लाक्षणिक ठिय्या सत्यागृह” ची जैय्यत तयारी झालेली आहे.


सुरुवातीस कलामंदिर परिसरात उपस्थित गरिब-गरजवंत माय-बाप ज्येष्ठनागरिकांना ज्येष्ठ नागरिक नेते,नांदेडभूषण ज्येष्ठ साहित्यिक तथा बालरोग विशेषज्ञ डाॅ. हंसराज वैद्य हेच फक्त या पदयात्रा व ठिय्या सत्यागृहाची सविस्तर माहिती, भूमिका तथा दिशा विषद करतील. तदनंतर डाॅ.हंसराज वैद्य यांच्या शुभ हस्ते हिरवी झंडी दाखऊन पदयात्रेची सुरूवात सकाळी 11च्या सुमारास होईल.


पदयात्रा डाॅ.लेन पद्मश्री शामरावजी कदम चौक ते शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, डाॅ.वैद्य रूग्णालय-जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, वजिराबाद-मुथाचौक,छ.शिवाजी महाराज पुतळा,नांदेड-वाघाळा महानगर पालिका कार्यालय, ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय मार्गस्थ होईल.ही “गरिब गरजवंत माय-बाप ज्येष्ठ नागरिक लक्ष वेधी मागण्या पदयात्रा तथा लाक्षणिक ठिय्या सत्यागृह”, फेस्काॅम संलग्न सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ,वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ आणि नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डाॅ.हंसराज वैद्य यांच्याच नेतृत्वाखाली तथा गिरिष बार्हाळे, व प्रभाकर कुंटूरकर, माधवराव पवार काटकळंबेकर, डाॅ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार,डाॅ.पुष्पा कोकिळ, प्रभा चौधरी, जिंतूरकर,सोमावाड, वाढवणकर, शुश्मा गहिरवार, खान मॅम अदिंच्या यांच्या मार्ग दर्शना खाली संविधाणिक पणे, स्वंय शिस्तीत, साखळीने, सावकाश मार्गस्थ होईल.


मागण्यांचे निवेदन केंद्र शासन व महाराष्ट्र शासनास मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या मार्फत पाठविण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालया समोर लाक्षणिक ठिय्या सत्यागृह करून दुपारी दोनच्या सुमारास सांगता होईल.



