bailpola ; पावसाची संततधार ..तरी शिंगे रंगविली..बाशिंगे बांधली ..चढविल्या झुली …! – NNL

लोहा | शिंगे रंगवली…बाशिंगे बांधली.. चढविल्या झुली..एनेदार…. राजा ..परधान्या ..वजीर पठाण …सुस्त .. मस्त असे दृश्य संतत्तधार पाऊस असताना बैल पोळ्याच्या निमित्ताने लोहा शहरात पाहवयास मिळाले लोहा शहरात जुन्या भागातील मारुती मंदिरास मुकदम यांचे बैल सर्वप्रथम फिरतात. सेवानिवृत्त कृषी अधिकारी माणिकराव मुकदम , माजी नगराध्यक्ष केशवराव मुकदम यांनी बैल फिरल्या नंतर शहरातील सर्व शेतकऱ्यांची बैल मारोती मंदिरास फिरली.

वाजती गळ्यात ..घुंगराच्या माळा सण बैल पोळा ऐसा चाले…असे शेतकऱ्यांचे आपल्या बैलावरील प्रेम दिसले.शहरात व तालुक्यात बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा झाला .पावसाची थोडी विश्रांती मिळाली आणि वाजतगाजत दारासमोर बैलांचे पारंपरिक पद्धतीने लग्न लावण्यात आले . पशुधन कमी झाले पूर्वी सारखा आता पोळा राहिला नाही असेच चित्र आजच्या दिवशी दिसून आले.पण मातीचे बैल पुजण्याची घरात मांडण्याची परंपरा कायम दिसली पावसाची संततधार ..जिकडे तिकडे आनंदात बैल पोळा साजरा झाला संवेदनशील असलेल्या काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button