
हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील सात दिवसापूर्वी म्हणजे दिनांक १३ तारखेला नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातील मौजे सरसम येथे होमियोपैथीक पदवी असलेल्या बोगस डॉ.पंडीत वाठोरे यांच्या सरसम गावात भर वस्तीत असलेल्या घरात दोन महिलांचा गर्भपात होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलिसांच्या टीमला घेऊन सरसम प्रहमीक आरोग्य केंद्राचे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.वैभव नखाते यांनी धाड टाकून बेकायदेशीर गर्भपात केंद्राचा भांडाफोड केला होता. तो डॉक्टर व दोन महिला तेथून पळून गेल्या असल्या तरी त्या बोगस डॉक्टरच्या घरी गर्भपाताचे औषधीसह गर्भपात करण्याच्या तयारीसाठी लागलेले सर्व साहित्य सापडले होते. वैद्यकीय अधिकारी व पोलिसांनी ते साहित्य जप्त करण्यापूर्वी घटनस्थळाचे फोटो विडो असे सव प्रकारचे सबळ पुराव्याची ऑनलाईन व ऑफलाइन नोंद घेतली. यासंदर्भात हिमायतनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होऊन देखील अवैद्य गर्भपात करून अभ्रकांची विल्हेवाट लावणारा बोगस डॉक्टर अजून देखील पोलिसांना का..? सापडत नाही असा प्रश्न आता जागरूक नागरिक उपाशी करू लागले आहेत.


नांदेड जिल्हातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या मौजे सरसम बु.गावामध्ये असलेल्या अबादीमध्ये दोन महिलांचा बेकायदेशीर गर्भपात करीत असल्याची गुप्त माहिती सरसम बु.येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नखाते यांना दिनांक १३ रोजी मिळाली होती. यावरून त्यांनी हिमायतनगर पोलिसांना सोबत घेऊन बेकायदेशीर गर्भपात करून अभ्रकांची विल्हेवाट लावली जात आसलेल्या ठिकाणी धाड टाकली. पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाला पाहून डॉक्टरसह येथे असलेल्या दोन महिलांनी अंधाराचा फायदा घेऊन पाठीमागच्या बाजूने पळून जाण्यात यशस्वी झाले. त्या बोगस डॉक्टरच्या घरी गर्भपाताचे औषधे, इतर साहित्य बैग सापडली असून, गर्भपाताच्या तयारीचे साहित्य ज्यात होमियोपैथीक असोशियनचे डॉ. पंडीत वाठोरे यांच्या नावाचे ओळखपत्र, विविध प्रकारचे पेनक्लियर गोळ्या, भूल देण्याचे इंजेक्शन, गर्भपात करण्यासाठी लागणारे एनपीटी किट्स, आदी साहित्य जप्त करण्यात आली होती. डॉ.वैभव नखाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोगस डॉ. पंडीत वाठोरे यांच्यावर अवैद्य गर्भपात आणि बोगस डॉक्टर म्हणून पोलिसांनी अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे. तरीदेखील तो डॉक्टर फरार झाला असून, पोलिसांना का..? सापडत नाही अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.

घटना उघडकीस आल्यानंतर या ठिकाणी नांदेड येथून फॉरेन्सिक लैबच्या टीमने येथे येऊन पंचनामा करून सर्व साहित्याची आणि घराची तपासणी केली आहे. तसेच त्या बोगस डॉक्टरांचे घर सील केले आहे. अवैद्य गर्भपात प्रकरणी शासनाने कडक कायदा केलेला असताना अनेक डॉक्टरांकडे सर्व सुविधा असताना या अवैद्य कारभापासून कोसो दूर असताना एक बोगस डॉट कोणाच्या अभयाने जि.प.मतदार संघाच्या मुख्य सरसम गावात हा अवैद्य प्रकार चालवीत होता. भर वस्तीत गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या खाजगी गर्भपात केंद्राकडे संबंधितांचे का..? दुर्लक्ष झाले असावे. ग्रामीण भागात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात होता कि काय…? आणि गर्भपात केल्यानंतर अभ्रकांची विल्हेवाट हा बोगस डॉक्टर कुठं..?लावता होता…याचा शोध पोलिसांनी घेणे आवश्यक आहे.


सरसम बु.येथे चालणाऱ्या बेकायदेशीर गर्भपात केंद्राचा कारभार ग्रामीण भागातील काही एजंटच्या मार्फत चालविला जात असल्याचे सांगितले जात असून, या कारभारात कोण कोण सामील आहे. कोणाच्या वरदहस्ताने हा प्रकार सरसम मतदार संघात चालविला जात होता. त्या दिशेने तपास करून या अवैद्य गर्भपात केंद्राचा तेलंगणा राज्यातील रॆकेटशी काही संबंध आहे का..? याना सहकार्य करणारे… मेडिकल मध्ये काम करणारे… मेडिकल औषधींचा पुरवठा करणारे मेडिकल चालक किंवा दवाखान्यात काम करणाऱ्या कंपाउंडर… यांचा सबंध आहे का..? गर्भपात करण्यापूर्वी कोणत्या ठिकाणी गर्भलिंग निदान करण्यात आले…या बोगस डॉक्टरने आतापर्यंत किती जणांचा गर्भपात केला आणि यात किती स्त्री जातीच्या अभ्रकाचा समावेश आहे, गर्भपात केलेल्या अभ्रकाची विल्हेवाट कशी व कुठे लावली.? या महापापात कोण कोण सामील आहेत… याचा तपास पोलिसांना करावं लागणार आहे.

घटना घडून सात दिवस लोटली असताना पोलिसांना बोगस डॉक्टर कसा काय..? सापडत नाही… घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा नंबर घेऊन ट्रेस करून शोध घ्यावा आणि त्यांचे कोळ रेकॉर्डिंग काढून त्याचे कोणाकोणाशी हितसंबंध होते हे उघड करावे. तसेच अवैद्य गर्भपात करून अभ्रकांची विल्हेवाट लावणारा बोगस डॉक्टरला तात्काळ अटक करून न्यायालयासमोर हजार करून रिमांडमध्ये घेऊन पोलिसी खाक्या दाखवत चौकशी करावी. आणि अभ्रकाची विल्हेवाट कुठं लावली याची माहिती काढून खोदकाम करून या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन सामील असलेल्या सर्वाना जेलची हवा दाखवावी जेणेकरून पुन्हा कोणीही असे महापाप करण्यासाठी पुढे येणार नाही आणि त्या बोगस डॉक्टरला अहकाऱ्या करून अभय देणाऱ्यास अद्दल घडवावी अशी रास्ता मागणी नागरीकातून केली जात आहे. याबाबत शहरासह तालुक्यात विविध चर्चेला उधाण आले आहे. याबाबत पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोगस डॉक्टर आणि अवैद्य गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचा तपास सुरु असून, लवकरच आरोपी डॉक्टरला गजाआड केलं जाईल अस त्यांनी सांगितले.
राज्यात बेकायदेशीर रित्या होणारे गर्भपात व प्रसव पूर्वी गर्भलिंग निदान चाचणी रोखण्यासाठी गर्भधारणापूर्वी आणि प्रसूतीपूर्वी निदानतंत्रे लिंग निवडीस प्रतिबंध कायदा १९९४ सुधारित कायदा २००३ (पीसीपीएनडीटी आणि एम.टी.पी.) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने “आपली मुलगी” https://amchimulgimaha.in हे नवे संकेतस्थळ सुरु केलं असून,याचबरोबर १८००२३३४४७५ व १०४ या टोलफ्री क्रमांकावर तक्रारदार माहिती देऊ शकतात. याबाबतची तक्रार संकेतस्थळावर करून माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस आणि गुन्हा करणाऱ्यास ३ ते ५ वर्ष सजा आणि एक लाखापर्यंत दंड अशी तरतूद सरकारने केली आहे. असे असताना देखील सरसम गावात गेल्या अनेक वर्षांपासून कोणीही अवैध्य गर्भपात होत असल्याची माहिती देण्यास पुढे का..? आले नाही. असा प्रश्नही या निमित्ताने पुढे येऊ लागला आहे.



