नांदेडधार्मिकव्हिडीओ

Maha Abhishek of Shri Parameshwara : श्री परमेश्वरचा महाअभिषेक व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला झाली सुरुवात

हिमायतनगर,अनिल मादसवार| संबंध भारतात प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर वाढोणा येथील श्री परमेश्वराच्या महाशिवरात्री यात्रेला सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे. सकाळी ०६ वाजता पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मंत्रोच्चार वाणीत मंदिर संस्थानचे सेक्रेटरी अनंतराव देवकते यांच्या हस्ते सपत्नीक श्री परमेश्वराचा महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर काकडा भजन होऊन सकाळी सात वाजता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि विना पारायण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.

IMG 20250224 154546 Maha Abhishek of Shri Parameshwara : श्री परमेश्वरचा महाअभिषेक व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला झाली सुरुवात

महाशिवरात्री निमित्ताने भव्य यात्रा महोत्सवाची सुरुवात झाली असून, भाविक भक्ताना मंदिरात येताच प्रसन्न वाटले पाहिजे यासाठी मंदिराच्या कळसासह प्रवेश द्वार व मंदिर परिसरात विदुत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच कळस व परिसरात भगव्या पताका आणि भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. सोमवारपासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात झाली असून, व्यासपीठ हरीभक्त परायण शिवाजी महाराज जाधव वडगावकर हे सांभाळत आहेत. त्यांच्या मधुर वाणीत पवित्र ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पठण केले जात असून, पहिल्याचा दिवशी शहरातील महिला, पुरुष व बालभक्तानी लक्षणीय उपस्थिती लावल्याने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी शेकडो भाविकांनी श्री परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी रांग लावली होती.

IMG 20250224 154924 Maha Abhishek of Shri Parameshwara : श्री परमेश्वरचा महाअभिषेक व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला झाली सुरुवात

शंकररुपी अवतारातील उभी असलेली काळ्या पाषाणातील श्री परमेश्वराची सगुणरूप मूर्ती याच पर्व काळात शेतीची नांगरठी करताना अंदाजे सातशे पंधरा वर्षापूर्वी शेतकऱ्याला सापडली होती. तेंव्हा गावकर्यांनी या ठिकाणी मंदिराची उभारणी करून महाशिवरात्रीच्या निमित्ताने भव्य यात्रा उत्सव साजरा केला होता. तेंव्हापासून महाशिवरात्रीच्या पर्वकाळात जवळपास पंधरा दिवस यात्रा भरविली जाते आहे. यात्रा उत्सवात सामील झालेल्या पारायणार्थी भक्तांना मंदिराच्या वतीने ज्ञानेश्वरी ग्रंथ देण्यात आला असून, यात्रा महोत्सव काळात सप्ताहभर धार्मिक कीर्तन, पारायण, प्रवचन, तसेच विविध शालेय स्पर्धा, कृषी, क्रीडा आणि भव्य शंकरपट आणि कुस्तीची दंगल आदी कार्यक्रम होणार आहेत.

parmesjwar Maha Abhishek of Shri Parameshwara : श्री परमेश्वरचा महाअभिषेक व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला झाली सुरुवात
Ornamental Shri Parameshwar Idol

महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री १२ नंतर श्रीच्या मूर्तीचा अलंकार सोहळा पुरोहितांच्या मंत्रोच्चारात तहसीलदार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यात्रा महोत्सवाच्या पर्व काळात पंचक्रोशीतील भाविक भक्त, शालेय विद्यार्थी व खेळाडूंनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर, उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, संचालक राजेश्वर चिंतावार, देवीदास मुधोळकर, प्रकाश कोमावार, शाम पवनेकर, विठ्ठलराव वानखेडे, सौ.लताबाई मुलंगे, सौ. लताबाई पाध्ये, राजाराम बलपेलवाड, वामनराव बनसोडे, प्रकाश शिंदे, माधव पाळजकर, श्रीमती मथुराबाई भोयर, शांतीलाल श्रीश्रीमाळ, एड दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, लिपीक बाबुराव भोयर गुरुजी आणि समस्त गावकरी मंडळीनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!